चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात अशोक पाटील यांच्या प्रचारात महिलांची आघाडी.
चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात अशोक पाटील यांच्या प्रचारात महिलांची आघाडी.
चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार अशोक पाटील यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत असून, या प्रचारात महिलांनी पुढाकार घेतला आहे. मतदार संघातील कुरळप वशी, लाडेगाव ,चिकूर्डे,देवर्डे,ऐतवडे खुर्द, इटकरे आदी गावात, घरोघरी जाऊन सौ अपर्णाताई अशोक पाटील व युवक क्रांती महिला आघाडीच्या महिलांनी थेट मतदारांशी संवाद साधत अशोक पाटील यांच्या कार्याची माहिती दिली आहे.
महिलांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रचाराला वेगळीच उर्जा मिळाली असून, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. “विकास, सुरक्षितता आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारा उमेदवार म्हणून अशोक पाटील यांच्यावर विश्वास आहे,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली.घरभेटी दरम्यान महिलांनी मतदारांशी संवाद साधत अशोक पाटील यांच्या सामाजिक कार्याचा, विकासकामांचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा उल्लेख केला. यावेळी प्रचाराला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी महिलांचे स्वागत करून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.या प्रचार मोहिमेमुळे चिकुर्डे मतदारसंघात भाजपचे वातावरण पोषक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महिलांची ही एकजूट आणि सक्रियता आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Comments
Post a Comment