कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयाची विविध ठिकाणी क्षेत्र भेट.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयाची विविध ठिकाणी क्षेत्र भेट.


कराड - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रमातील इतर प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व अभ्यासक्रमांमध्ये अधिक ज्ञान तसेच आवड निर्माण होण्याकरिता  विविध ठिकाणांच्या  क्षेत्र भेटींचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कराड येथील जैविक कचरा व्यवस्थापन प्रकल्प या ठिकाणी भेट दिली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कंपोस्टिंग खत कसे तयार केले जाते तसेच जैविक कचरा म्हणजे काय, जैविक खत तयार करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत तसेच जैविक कचऱ्यापासून कंपोस्टिंग खते कशी तयार केली जातात. तसेच ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण कसे केले जाते आणि या सर्वामुळे कोणकोणते फायदे होतात याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालय उंडाळे येथील भेटीमध्ये रुग्णालयामध्ये असणारी वेगवेगळे डिपार्टमेंट जसे की एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, आयसीयू, सिटीस्कॅन मशीन, तातडीक सेवा विभाग, प्रसूती विभाग तसेच मेडिकल विभाग याविषयी माहिती देण्यात आली.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. पुजा भोसले यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी या भेटींचे आयोजन केले होते.  या भेटीवेळी विद्यार्थ्यांच्या समवेत प्रा. पुजा भोसले व लॅब टेक्निशियन साधना सलगर या उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .