महिला महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
महिला महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्यावतीने आयोजित "बँकिंग परीक्षेची तयारी व संधी" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड व नॅशनल इन्स्टिटयूट फॉर बँकिंग एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने "बँकिंग परीक्षेची तयारी व संधी" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा महिला महाविद्यालय कराड येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेसाठी मा. विजय भागवत (माजी व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र), मा. अजित देशपांडे (औदयोगिक क्षेत्रातील तज्ञ) व मा. नारायण आचलेरकर (माजी व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन मा. बाळासाहेब कुलकर्णी हे होते.
मा. विजय भागवत यांनी बँकिंग परीक्षेची तयारी करताना बेसिक संकल्पना सांगितल्या. मा. अजित देशपांडे यांनी बँकिंग परीक्षेतील गणितीय उदाहरणे सोप्या पद्धतीने कशी सोडवता येतात हे प्रत्यक्ष उदाहरणे सोडवून सांगितले. मा. नारायण आचलेरकर यांनी बँकिंग परीक्षेचे स्वरूप तसेच तर्किक क्षमता, अंकगणितीय क्षमता याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन मा. बाळासाहेब कुलकर्णी यांनी विध्यार्थीनींनी या संधीचा लाभ घ्यावा व मोठया शहरांप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील तज्ञ आज ग्रामीण भागात येऊन याप्रकारचे मार्गदर्शन देत असल्यामुळे मोठया बँकात उच्च पदावर महाराष्ट्रीयन लोकांचा टक्का वाढेल अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला तसेच महाविद्यालयात सुरु असलेले उपक्रम व शैक्षणिक प्रगती याबाबत माहिती सांगितली. तसेच ही कार्यशाळा शिक्षण मंडळ कराडचे सचिव मा. चंद्रशेखर देशपांडे यांच्या सहकार्यामुळे घेता आली हे हीआवर्जून सांगितले.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य मा. डॉ. पराग सोनटक्के, प्रो. डॉ. स्नेहल प्रभुणे, प्रो. डॉ. उज्वला ताठे, डॉ. अर्जुन ओहळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळेचे सचिव प्रा. किशोर गुजर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यशाळेचे संयोजक डॉ. अखिलेश शिंदे यांनी करून दिला तर आभार प्रा. विलास सुर्वे यांनी केले. वाणिज्य विभागातील डॉ. ज्योती मोहोळकर, प्रा. वैशाली काटकर, प्रा. दिपाली शिंदे व प्रा. संजीवनी पट्टेबहाद्दूर यांनी तीनही सत्रांचे नियोजन उत्तमरित्या पार पाडले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच बी.कॉम., बी.कॉम. (IT), बी.ए., बी. एस्सी. च्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment