कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे गिरीश देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे गिरीश देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न.
उंडाळे :- प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे ओव्हरविव्ह ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड इनवेंटरी कंट्रोल या विषयावरती टेक्निकल सर्विस टेक्नोफ्युशन लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर गिरीश देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये लागणारा कच्चा माल, मनुष्यबळ, मशिनरी, वेळेचे व्यवस्थापन आणि नियोजन हे योग्यरितीने कसे पार पाडायचे की ज्यामुळे कमी खर्चात आपले उत्पादन पूर्ण होईल आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतील. तसेच उत्पादन नियंत्रणाचे मुख्य घटक जसे की प्रगतीचा मागवा घेणे, तुलना करणे, विचलन शोधणे, दुरुस्ती करणे तसेच त्याची वैशिष्ट्ये व फायदे काय आहेत याविषयी मार्गदर्शन केले.

Comments
Post a Comment