वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये बालिका दिन उत्साहात संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये बालिका दिन उत्साहात संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये बालिका दिन उत्साहात संपन्न.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ शिक्षिका ए आर पाटील -साळुंखे मॅडम यांनी केले.याप्रसंगी कार्यक्रम अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए सी सदावर्ते सर होते प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिक्षिका ए आर पाटील -साळुंखे मॅडम यांनी केले.विद्यालयातील प्रा. बी एम नलवडे सर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्य याविषयी माहिती देऊन आजही महिला विविध प्रश्नांवर कार्य करण्याची गरज व्यक्त केली.महिलासंबंधी नव्या समस्या निराकरण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालय मुख्याध्यापक श्री ए सी सदावर्ते सर यांनी बालिका दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला गौरव केला.महिलांनी विविध क्षेत्रात नवीन नवीन आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन यु आर पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री एस एच इंगवले सर यांनी केले

Comments
Post a Comment