कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे शिवाजी नेर्ली यांचे व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे शिवाजी नेर्ली यांचे व्याख्यान संपन्न.
कराड :- प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे मूल्य व तंत्रशिक्षण व पर्यावरण शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास या विषयावरती समाज प्रबोधक शिवाजी नेर्ली यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये कोणती मूल्ये असावीत तसेच सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यास, वर्तन, शिस्त व आदर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. मूल्य संवर्धन व पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणा निर्माण करण्यासाठी त्यांनी रचलेले स्वयंरचित काव्यरचना यावेळी सादर करण्यात आली. या व्याख्यानाचा उद्देश म्हणजे समाजामध्ये सुशिक्षित होत असलेल्या व झालेल्यांना कर्तव्यदक्ष बनविण्यासाठी मदत करणे व जागतिक पर्यावरणाचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत करणे असा होता. यावेळी विद्यार्थ्यांच्याकडून समाजप्रबोधनाच्या पुढील कार्यासाठी स्वेच्छेने त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . पूजा भोसले व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी मानले.

Comments
Post a Comment