जान फाउंडेशन व मानव कल्याणकारी संघटना करणार आंदोलन.
जान फाउंडेशन व मानव कल्याणकारी संघटना करणार आंदोलन.
कराडातील कृष्णा नदी पुलावर संरक्षक जाळी बसवण्याच्या मागणीसाठी.
निवेदनाद्वारे 26 जानेवारी रोजी दिला आंदोलनाचा इशारा.
कराड - प्रतिनिधी.
जान फाउंडेशन व मानव कल्याणकारी संघटना यांनी मा. जिल्हाधिकारी सातारा यांना कराडातील कृष्णा नदीवर पुलावर पुलावर संरक्षक जाळी बसवण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले. 26 जानेवारी 2025 पर्यंत मागणीची पूर्तता न झाल्यास 26 जानेवारी रोजी कराड येथील कृष्णा पुलावरच आंदोलन करण्यात येईल असं निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे.
कृष्णा नदीच्या पुलावरून नागरिक नदीपात्रामध्ये केरकचरा टाकून प्रदूषण घडवून आणतात. त्याचबरोबर पुलावरून होणाऱ्या आत्महत्याच्या घटना रोखण्यासाठी कृष्णा नदीच्या कराड येथील पुलावर संरक्षक जाळी बसवावी याची मागणी निवेदनाद्वारे केली. वारंवार या पुलावर संरक्षक जाळी बसवण्याची मागणी होत असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. 26 जानेवारीपर्यंत ही संरक्षक जाळी बसली नाही तर आंदोलन करणार असं जान फाउंडेशन व मानव कल्याणकारी संघटनेचे पदाधिकारी मा.जावेद नायकवडी, मा.सलीम पटेल, मा.शशांक नांगरे, मा.इम्रान मुल्ला,मा.फिरोज मुल्ला,आदी प्रमुख पदाधिकारी यांनी प्रशासनाला निवेदन दिले.

Comments
Post a Comment