कु. गायत्री पवारची शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड.
कु. गायत्री पवारची शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड.
कराड - प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराडच्या महाविद्यालयात बी.ए. भाग तीन मध्ये शिकत असलेली कु. गायत्री मोहन पवार हिची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली असून, पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ क्रिकेट (महिला) स्पर्धा बन्नस्थळी विद्यापीठ, जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. हे यश संपादन करण्यासाठी तिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रितम मिसाळे यांचे मार्गदर्शन लाभले.या तिच्या यशाबद्दल शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन, सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी व सर्व पदाधिकारी तसेच महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ, प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment