कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म) घोगाव महाविद्यालयाची सातारा येथे औद्योगिक क्षेत्र भेट

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म) घोगाव महाविद्यालयाची सातारा येथे औद्योगिक क्षेत्र भेट

उंडाळे -  प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रमातील इतर प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व अभ्यासक्रमांमध्ये अधिक ज्ञान तसेच आवड निर्माण होण्याकरिता सातारा येथील झुसामेन लाईफ सायन्सेस अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड सातारा या औद्योगिक क्षेत्रास भेटीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी  कंपनीचे मॅन्युफॅक्चरिक हेड अशोक हतवळणे  यांनी विद्यार्थ्यांना  टॅबलेट कशा बनवायच्या त्याचे पॅकेज कसे करायचे, डिपार्टमेंट कोण कोणते होते,  टॅबलेट, सिरप यांचे स्टोरेज कसे करायचे बॅच कशा वापरायच्या या विषयी माहिती देण्यात आली.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरुणा परीट यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी या भेटींचे आयोजन केले होते. या भेटीवेळी विद्यार्थ्यांच्या समवेत अकॅडमिक इन्चार्ज प्रा. मोनिका शिंदे व प्रा. अरुणा परीट  उपस्थितीत होत्या.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .