शिव केदार विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न.
शिव केदार विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न.
शिराळा पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.
विज्ञान प्रदर्शन उद्घाटन समारंभ कार्यक्रम विद्यालयाच्या भव्य प्रांगणात पार पडला.मा. निवासराव पाटील काका हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.मा. पोपटराव मलगुंडे गटशिक्षणाधिकारी प.स. शिराळा या कार्यक्रमास मा. बाजीराव देशमुख शिक्षण विस्तार अधिकारी, सरपंच, उपसरपंच, मा. शशिकांत पाटील, अनिल पवार, विलास हुजरे, अरविंद पाटील, दीपक पाटील, अभिजीत चव्हाण, संजय कुंभार,सर्व संचालक वारणा विकास शिक्षण मंडळ कांदे,बी. आर. पाटील, बी.के. गायकवाड, सुहास दळवी, अरविंद सदावर्ते, बादशहा नदाफ, सुभाष पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी विज्ञान गीत व स्वागत गीत गायन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा. मुख्याध्यापक संजय पाटील यांनी केले, यावेळी सरपंच रोहित शिवजातक, मा.बाजीराव देशमुख, उपक्रम मलगुंडे यांची भाषणे झाली. विज्ञान प्रदर्शनाच्या उपकरणांच्या दालनाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले, शेवटी आभार स्मिता पाटील मॅडम यांनी मांडले. कार्यक्रमास शिराळा तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Comments
Post a Comment