काव्य गायनाने रंगला माता सावित्रीबाईंच्या जयंतीचा सोहळा.
काव्य गायनाने रंगला माता सावित्रीबाईंच्या जयंतीचा सोहळा.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, शिक्षणमहर्षी .बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई उत्सव काव्यवाचन अतिशय उत्साहात संपन्न झाले. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे नवीन वर्षातला पहिला उत्सव. त्यामुळे त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हायलाच हवी. जेव्हा आपण एखाद्या थोर व्यक्तीमत्वाची वेशभूषा परिधान करत असतो. तेव्हा नकळतपणे त्यांचे विचार त्यांचे व्यक्तिमत्व हे आपल्यामध्ये संचारत असते. तसेच दैनंदिन जीवनात आपण तसे वागावे याची जाणीव करून देत असते. तात्कालीन परिस्थितीमध्ये स्त्रीला माणूस म्हणूनच अधिकार नसताना शिक्षणाचा अधिकार मिळणे ही फार मोठी गोष्ट होती. सावित्रीबाईंनी त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची द्वारे खुली करण्यासाठी आपले जीवन व्यतीत केले. त्या महात्मा फुले यांची सावली बनून न राहता त्यांनी स्वतःच एक वेगळे व्यक्तिमत्व सिद्ध करून समाजकार्य व लेखन कार्य करत राहिल्या.
आजच्या मुलींनी त्यांच्या या कार्याची आठवण ठेवून स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सिद्ध करावे. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यावर समर्पित काव्यवाचन करण्यासाठी केंगार रिद्धी ,अमृता डवरी या दोन विद्यार्थिनींनी काव्यवाचन केले. तर प्राध्यापकांमध्ये डॉ. शितल गायकवाड ,प्रा.सुषमा चंदुगडे, प्रा.प्रियांका मदने , प्रा.डॉ.स्वाती मोरकळ ,प्रा.शैला चोबे , डॉ आशा सावंत , प्रा. ऋतुजा भाटले प्रा. दिपाली वाघमारे प्रा. तेजस्विनी दळे , प्रा शितल सालवाडगी , प्रा सुरेश रजपूत ,प्रा जीवन आंबुडारे , प्रा.अभिजीत दळवी या सर्वांनी काव्य वाचन केले महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख प्रा. दिपक गुरव यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा करून कार्यक्रमास रंगत आणली.प्रास्ताविक महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्षाच्या समन्वयक प्रा. सोनाली रांगोळे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मी जाधव यांनी केले. आभार प्रा.शैला चोबे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments
Post a Comment