कर्तुत्ववान राजकारणी व्यक्तीस महाराष्ट्र मुकला.
कर्तुत्ववान राजकारणी व्यक्तीस महाराष्ट्र मुकला.
28 जानेवारी सकाळी झोपेतून उठून आपल्या कामावर जाण्याची तयारी करत असताना एखाद्या मोठ्या स्फोटाचा आवाज कानावर यावा अशी बातमी येऊन कानावर धडकली बारामतीत अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. आणि राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले मन ग्वाही देत नव्हते, अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. तो कुणाला कधी भेटेल आणि कसा भेटेल याचा काही नियम नाही असाच, बुधवार दिनांक 28 जानेवारी सकाळी 9:45 वाजता स्पष्ट परखड बोलणारे सडेतोड दिलदार आणि शब्दाला जागणारे नेतृत्व अकाली निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आणि महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला....!
अजित दादा यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे सुपुत्र होत त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण देवलाळी प्रवरा येथेच पूर्ण केले बी.कॉम ची पदवी मुंबई येथे पूर्ण केली. अजित पवारांनी 1982 मध्ये सहकारी कारखान्यातून आपल्या राजकीय प्रवासा सुरुवात केली 1991 मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले 19 91 पासून सलग बारामती विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते त्यांनी जलसंपदा अर्थनियोजन ऊर्जा यासारखी महत्त्वाची खाती सांभाळणे राजकारणात खासदार आमदार मंत्री उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते असाही राजकीय प्रवास पार केला.
अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे.
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजित पवारांनी कामगिरी बजावली. १९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. अजित पवार १९९१ साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ ते १९९५ या काळात ते विधानसभा सदस्य होते.
अजित पवार नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत. १९९९ ते २००४ या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते.
१९९५ पासून २०१९ पर्यंत सलग सात वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ०१ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त मतांनी अजित पवार निवडून आले. २०१० पर्यंत ते जलसंपदा खात्याचे मंत्री होते. अजित पवारांवर २०१४ साली सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते.
२०१९ साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलली शपथ अनेकांसाठी धक्का होता. अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली होती.
आम्ही बोलत नाही करून दाखवतो असे बोलत अजित दादांनी बारामती सह संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली.सहकार, जलसंपदा, सिंचन क्षेत्रात अजित पवारांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याच निर्णयामुळे राजकरणात त्यांची पकड आणखी मजबूत झाली. सहकार क्षेत्रात बजावलेल्या निर्णय भूमिकेमुळे अजित पवार याचा दबदबा अधिकच वाढला आणि प्रशासनावर मजबूत पकड तयार झाली. त्यामुळे राज्यपातळीवर ते पावर सेंटर ठरले.बहिणींना पोरके केले भावाने.


Comments
Post a Comment