कराड येथील एन. पी. फिश कंपनीला “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025”
कराड येथील एन. पी. फिश कंपनीला “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025”
कराड/प्रतिनिधी
कराड येथील सुप्रसिद्ध एन. पी. फिश कंपनीला “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मासे विक्री आणि सीफूड उद्योगात गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहक विश्वास यांचे उच्च मानक निर्माण करणाऱ्या एन. पी. फिश कंपनीच्या कार्याची ही मान्यताच आहे.
(स्व.) महादेव सदोजी पाटील आणि श्री. काशिनाथ महादेव पाटील यांनी घालून दिलेल्या परंपरेवर उभारलेल्या या उद्योगाची पुढील पिढीतील वाटचाल पाटील बंधूंनी – श्री. अजित पाटील व श्री. सुनिल पाटील – यांनी यशस्वीपणे पुढे नेली आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाची जोड देत त्यांनी एन. पी. फिश कंपनीला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेले आहे.
ताज्या आणि शुद्ध उत्पादनांचा पुरवठा, पर्यावरणपूरक शाश्वत पद्धती, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी आणि कार्यक्षम पुरवठा साखळी यामुळे एन. पी. फिश कंपनीने मासे विक्री व सीफूड क्षेत्रात नवे मानक निर्माण केले आहे. या पुरस्कारामुळे कंपनीच्या संपूर्ण टीमच्या समर्पणाची, उद्योजकतेच्या सामर्थ्याची आणि ग्राहकांवरील अटळ विश्वासाची दखल घेतली गेली आहे.
एन. पी. फिश कंपनीच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रातील व्यवसायिक क्षेत्रात सकारात्मक प्रेरणा निर्माण झाली आहे. पुढील काळात कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव उज्ज्वल करेल, नवीन तंत्रज्ञान अवलंबेल आणि ग्राहकांना अधिक उत्कृष्ट सेवा देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या यशाबद्दल एन. पी. फिश कंपनीच्या सर्व संचालक, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments
Post a Comment