सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना

 सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना  ____प्रा. अधिकराव कणसे.

कराड - प्रतिनिधी.

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न होत आहे. शिबिरातील राजकीय सेवा योजना व स्फूर्ती गीते प्रबोधन पर कार्यक्रमात पहिले पुष्प गुंफण्यासाठी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अधिकराव कणसे होते.आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. मन, मनगट, मेंदूच्या बळावरती माणसं शून्यातून विश्व निर्माण करतात. याची अनेक उदाहरणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पहावयास मिळतात. आपल्या वक्तृत्वाच्या जीवावरती राजकीय पटलावरती आपले व्यक्तिमत्व उंची वरती नेणारे आर. आर. (आबा) पाटील राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री झाले . समाजाची सेवा करून बाबा आमटे यांनी जनमानसात आपले अढळ स्थान निर्माण केले. गावातील ग्राम स्वच्छता करता करता परस्परातील मनभेदांची सफाई झाली त्यामुळेच जगास प्रेम बंधू भावाच्या पटलावरती घेऊन जाण्यास राष्ट्रीय सेवा योजना समाज जागृती चे प्रमुख साधन आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन निर्मूलन, शेतीच्या समस्या, आरोग्याच्या समस्या,  स्त्री शक्तीचा जागर असेल असे एक ना दोन अनेक प्रश्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतात. या शिबिरांमधील सर्व शिबिरार्थी नक्कीच समाजसेवेचा आदर्श निर्माण करतील असे मला वाटते.

              या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेची स्फूर्ती गीते माननीय प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे  यांनी सादर केली. सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका यांना ही गीते त्यांनी गायला लावली. त्यामुळे कार्यक्रमात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. आपल्या मार्गदर्शनात सर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या या गीत गायनाने स्वयंसेवक व स्वयंसेविकांना श्रम करण्याची प्रेरणा मिळते व या श्रमसंस्कारातून समाजसेवा घडते.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय थोरात होते. राष्ट्रीय सेवा योजना स्फूर्ती गीते व जबाबदारीची जाणीव करून देणारा आजचा हा कार्यक्रम प्रेरणादायी आहे.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार, सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ बंधू -भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. रघुनाथ गवळी, प्रा. अण्णासाहेब पाटील व सर्व एनएसएस कमिटी कमिटीतील सदस्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .