तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला सुसंस्कारित करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ग्रंथ वाचन.
तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला सुसंस्कारित करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ग्रंथ वाचन______ प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व मराठी भाषा पंधरवडा यानिमित्ताने ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्ञान शिदोरी दिन, उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन, व ग्रंथदान करण्यात आले. या समारंभाचे उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला सुसंस्कारित करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ग्रंथ वाचन होय. आज महाविद्यालयात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान शिदोरी दिन साजरा होत असताना ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन व ग्रंथदान हा अतिशय स्तुत्य उपक्रम ग्रंथालय विभाग व मराठी विभागाच्या वतीने राबविण्यात आला आहे. विद्यार्थी जीवनात जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केले तर भविष्यकाळात येणारी अनेक आव्हाने आपण पार करू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे हे दूध जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ग्रंथच आपले व्यक्तिमत्व परिवर्तन करू शकतात. विकसित भारताच्या उभारणीसाठी केवळ तंत्रज्ञान अवगत असलेली युवा पिढी उपयुक्त ठरणार नाही. ती सुसंस्कारित असणे तितकेच महत्त्वाचे आहे. संस्थेचे आराध्य दैवत शिक्षणमहर्षी बापूजींनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार हे विचार विश्व दिले. याच विचार विश्वाची गरज आजच्या युवा पिढीला आहे. पुस्तक वाचनाने विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक आणि भावात्मक पातळीवरती तयार होत असतो. त्यामुळे ग्रंथासारखा मित्र प्रत्येकाने जोपासला पाहिजे. आज या ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदान व ग्रंथ वाचन समारंभाचे उद्घाटन झाल्याचे मी जाहीर करतो!
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी सामूहिक ग्रंथ वाचन केले. गुरुदेव कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाकडे ग्रंथ दान केलेले ग्रंथ विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्यात आले. ग्रंथ प्रदर्शन ग्रंथालय विभागाने सर्वांसाठी खुले ठेवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.सोनाली रांगोळे यांनी केले . आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ गवळी यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.शितल सालवाडगी यांनी केले. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये प्रा. स्मिता कालभूषण यांनी सहभाग घेतला. ग्रंथालय कमिटीचे प्रा. सचिन बोलाईकर, डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. ज्योती धर्माधिकारी, ग्रंथालय विभागाच्या प्रा. सुषमा चंदुगडे, सेन मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे, प्रा. सुरेश यादव व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment