५५ कोटींचे एमडी ड्रग्ज कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथून जप्त.
कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे महसूल गुप्तचर विभागाची(DRI) कारवाई
उंडाळे: प्रतिनिधी.
कराड तालुक्यातील पाचुुपतेवाडी या गावात पोल्ट्री शेडमध्ये तयार होत असलेल्या अमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मितीच्या कारखान्यावर पुणे विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआर आय) शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यात ५५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले.कराड तालुक्यातील पाचुुपतेवाडी या गावात पोल्ट्री शेडमध्ये तयार होत असलेल्या अमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मितीच्या कारखान्यावर पुणे विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआयआर) शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यात ५५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले.कराड तालुक्यातील डोंगरी भागात आणि कराड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाचुुपतेवाडी गावामध्ये एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना सुरू होता.अंमली पदार्थांचा कारखाना गावापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या पोल्ट्री शेडमध्ये ड्रग्ज निर्मिती केली जात होती. डीआयआरच्या पथकाने शनिवारी सायंकाळी या शेडवर छापा टाकला. शेडमध्ये एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त करण्यात आला, तसेच संशयितांना ताब्यात घेऊन पोल्ट्री शेड सील करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे ५५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Comments
Post a Comment