Posts

Showing posts from May, 2020
Image
शिराळा तालुक्यातील मणदूर येथे जनावरांच्या शेडला आग लागुन शेडसह शेती औजारे जळुन खाक. अंदाजे एकूण  1 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान.   शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार) शिराळा तालुक्यातील मणदूर येथील यशवंत केरु पाटील यांच्या जनावरांच्या शेडला गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान अचानक आग लागली. आगीमध्ये शेडसह गवत,सायकल तीन,शेती औजारे, इंजिन,पी.व्ही.सी.पाईप लाईन जळुन खाक झाली असुन अंदाजे 1 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.घटनेचा पंचनामा तलाठी भास्कर पाटील यांनी केला असुन,घटनास्थळी सरपंच वसंत पाटील, उपसरपंच विजय चौगुले,पोलिस पाटील पांडूरंग बडेकर,ग्रामसेवक एम.एन.पाटील व ग्रामस्थ उपस्थीत होते.                       
Image
शिराळा तालुक्यात  पावसाने हजेरी लावुन मान्सुन आगमनाची जणु सलामीच दिली.   शिराळा - प्रतिनिधी( आनंदा सुतार)  शिराळा तालुक्यात खुजगांव, शेडगेवाडी ,आरळा गुढे  परिसरात  तसेच  तालुक्यात इतर ठिकाणी ही पावसाने विजांच्या गडगडाटासह हजेरी लावली. परिसरात दुपारी दोन वाजल्यापासून  पावसाने सुरुवात केली असल्याने शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडाली मात्र उकाड्याने हैरान झालेल्यांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. तर शेतकर्‍यांनी उन्हात घातलेले वाळवण काढताना सर्वांची कसरत झालेली पहावयास मिळाली. तसेच काही ठिकाणी भात पेरणी चालु असुन बळीराजाची मात्र धादल आलेल्या पावसाने केली.काही नी पेरणी अर्धवट सोडुन घर गाठले. यंदा मान्सुन दाखल वेळेवर होत आहे पण गत वर्षा सारखा दिड महिना हुलकावणी दाखवेना म्हणजे बरं असे मत परीसरातील शेतातुन घरी येणार्‍या झाडा खाली आडोशाला थांबलेल्या बळीराजाचे गुपचुप चर्चात्मक विषय ऐकावयास मिळत होते.
Image
शिराळा तालुक्यात  पावसाने हजेरी लावुन मान्सुन आगमनाची जणु सलामीच दिली.         शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार) शिराळा तालुक्यात खुजगांव, शेडगेवाडी ,आरळा गुढे  परिसरात  तसेच  तालुक्यात इतर ठिकाणी ही पावसाने विजांच्या गडगडाटासह हजेरी लावली.  परिसरात दुपारी तिन वाजल्यापासून अवकाळी पावसाने सुरुवात केली असल्याने शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडाली मात्र उकाड्याने हैरान झालेल्यांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. तर शेतकर्‍यांनी उन्हात घातलेले वाळवण काढताना सर्वांची कसरत झालेली पहावयास मिळाली. तसेच काही ठिकाणी भात पेरणी चालु असुन बळीराजाची मात्र धादल आलेल्या पावसाने केली.
Image
जिल्ह्यात 24 कोरोना पॉझिटिव्ह; होळ ता. फलटण येथील वृध्द महिला मृत्यु पश्चात कोरोना बाधित. सातारा दि. 29  (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 24 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. फलटण तालुक्यातील होळ येथील 85 वर्षीय वृध्द महिला  ‘सारी’ ने  आजारी होती.  काल दिनांक 28 मे रोजी तिचा मृत्यु  झाला होता. मृत्यू पुर्वी तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते ते तपासणीमध्ये तो रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. या 24 बाधित रुग्णांची  तालुकानिहाय गावे आणि संख्या पुढीलप्रमाणे..  *फलटण तालुक्यातील* वडले येथील 1, जोरगाव येथील 1, होळ येथील 1 (मृत वृध्द महिला), साखरवाडी येथील 1. *माण तालुक्यातील* म्हसवड येथील 1, दहीवडी येथील 1, राणंद येथील 1. *पाटण तालुक्यातील* नवारस्ता येथील 1, जांभेकरवाडी (मरळोशी) येथील 2, आडदेव येथील  1. *खटाव तालुक्यातील* अंभेरी येथील 5, निमसोड येथील 1, कलेढोण येथील 2. *सातारा ताल...
Image
गोतावळा मोठा मात्र अंतिम क्षणी ना कोणी कारण "कोरोना". मोहरे येथे अंत्यसंस्कार शिराळा तालुक्यातील कोरोना बाधित पहिल्या रुग्णाचा बळी!  शिराळा  -प्रतिनिधी  (आनंदा सुतार) गोतावळा मोठा मात्र अंतिम क्षणी ना कोणी कारण "कोरोना" संपुर्ण कुंटुब शिराळा येथे अलगिकरण केले आहे. घरी आपले म्हणारे  कोनी नव्हते, मोहरे ता. शिराळा येथील कोरोना बाधित रुग्णावर शासनाच्या नियमा नुसार मोहरे येथे त्यांच्या मूळगावी वारणा नदी काठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित व्यक्ती मुंबई येथे वास्तव्यास होती.हे कुटुंब मुंबईहून१५ मे रोजी मोहरे येथे आले होते.त्यांना गावातच होम क्वारंटाईन केले होते .  मयत पन्नास वर्षीय वृध्दास बुधवारी त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते त्यांचा कोरोना अहवाल   पॉझिटिव्ह आला त्यानंतर  आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कातील १४ जणांना शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वस्तीगृहात संस्थात्मक अलगीकरण केले होते. पश्चिम भागातील मोहरे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दगावल्याने , तो तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला असू...
Image
कोरोनाच्या संकटामुळे कोडोली गावातील गोदडगिरी महाराजांचा भंडारा रद्द. कार्वे प्रतिनिधी :-                       कोडोली ता. कराड येथे गोदडगिरी महाराजांची संजीवन समाधी असल्यामुळे हे गाव पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. गेले जवळजवळ शंभर वर्षापासून ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या गुरुवारी येथे भंडारा आयोजित करण्यात येतो. या भंडाऱ्या मध्ये मठाच्या आवारात भात ,आमटी बनवली जाते. सदर भंडाऱ्याचे सर्व साहित्य प्रत्येक घरांमधून गोळा केले जाते. व प्रत्येक घरातून सात भाकरी प्रमाणे भंडार्‍याच्या दिवशी मटामध्ये दिल्या जातात. विशेषता  या महाप्रसादा मध्ये भात,आमटी  व भाकरीचा समावेश  केला जातो . या दिवशी गावांमध्ये चूल पेटत नाही .सर्व ग्रामस्थ मठाच्या आवारात एकत्र बसून हा महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात .       परंतु यावर्षी जागतिक महामारी कोरोना मुळे होणारा भंडारा मठाचे मठाधिपती, सरपंच ,पोलिस पाटील ,दक्षता समिती सर्व सदस्य ,प्रसिद्ध नागरिक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने प्रशासनास सर्व सह...
Image
कोडोलीतील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलला. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित उपलब्ध करून देण्यात आला. कार्वे प्रतिनिधी :-                     कोडोली ता. कराड येथील वाकान नावाच्या शिवारातील  ट्रांसफार्मर  नादुरूस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रचंड उन्हामुळे सध्या शेतीच्या पाण्याचा उपसा करताना डीपी वरील तान वाढून वीज पंप जळत आहेत. तसेच ट्रान्सफॉर्मर वर लोड येत असल्यामुळे त्यामध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यातच मान्सूनपूर्व हंगाम चालू झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. भात पेरणी ,सोयाबीन, भुईमूग टोकणी , ऊस लागणी व शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. अशातच डीपी बिघडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. डीपी नादुरुस्त असल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.              विद्युत ट्रान्सफॉर्मर सतत बिघडत असल्याचे अडचण कोडोलीतील स्थानिक  शेतकऱ्यानी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे फोनद्वारे संपर्क साधून मांडले होती.याची दखल घेऊ...
Image
भाजपा महिला मोर्चा  सातारा जिल्हाध्यक्ष कविता कचरे यांची तळमावले येथील कोरोना सेंटरला भेट . तळमावले-  प्रतिनिधी  भाजप महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष कविता कचरे तळमावले येथील कोरोना केअर सेंटर ला भेट देऊन सर्व कोरंटाईन लोकांची माहिती घेतली, व तेथील लोकांना मास्कचे वाटप करण्यात आले. तेथील लोकांच्या बरोबर संवाद साधून तेथील सुविधांच्या बाबतीत सरपंच व उपसरपंच यांच्या सोबत चर्चा केली. ज्या सोयी सुविधा बाबत त्याना त्या ठिकाणी उणिवा जाणवल्या त्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी तेथील प्रशासनाशी विनंती केली.  सध्या त्या कोरोना सेंटरमध्ये 71 लोक कोरंटाइन आहेत अजूनही संख्या वाढते आहे. तरी प्रशासनाने त्वरित त्या क्वारंटाइन सेंटरमधील सेवा सुविधामध्ये सुधारणा करावी. अशी इच्छा व्यक्त केली.
Image
शिराळा तालुक्यात खिरवडे येथील वृध्दास कोरोनाची लागण. सदर व्यक्ती मुबंई  येथुन कुंटुबासह गावी आली होती.  शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार) मुंबईहून  खिरवडे तालुका शिराळा येथे आपल्या मूळ गावी कुंटुबासह आलेल्या एका चाकरमान्यास कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला आरोग्य विभागाने शनिवारी दि. २३ मे रोजी मिरज येथील कोवीड रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असल्याची माहिती कोकरुड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. घुले यांनी दिली.    डॉ. घुले म्हणाले संशयित रुग्ण दि.२० मे रोजी मुंबईहून आपल्या सख्ख्या चुलत भावाच्या कुटुंबासहआले होते. तसेच  त्यांच्या सोबत शिरसटवाडी येथील एक नातेवाईक ही सोबत आला होता.  हे कुंटुब शेडगेवाडी येथे एक दिवस मुक्कामी होते त्यानंतर त्यांना खिरवडे येथे गृहअलगीकरन केले होते त्यांची दररोज आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत होती त्याला मागील चार दिवसांपासून सर्दी ताप येत होता यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेत याच्यावर उपचार चालू केले दरम्यान शनिवारी २३ रोजी सकाळी त्यास पुन्हा ताप आल्याने तसेच कोरोनाची संभाव्य लक्षणे दिसू लागल्य...
Image
शेडगेवाडी येथे मुख्य चौकातील दुकानात चोरी. शिराळा - प्रतिनिधी(आनंदा सुतार) शेडगेवाडी ता. शिराळा येथील जयहिंद कटलरीचे दुकान फोडून चोरट्यांने दुकानातील पंचवीस हजाराची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली असून अज्ञात व्यक्तीवर कोकरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                  मेघराज सिखाराम चौधरी यांचे शेडगेवाडी फाटा या ठिकाणी जयहिंद कटलरीचे दुकान मागील तीन वर्षापासून आहे तो दुकानच्या वर पहील्या माळ्यावरच राहयला असुन देखील त्याला याची चाहुल लागली नाही .शुक्रवार दि.२२ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञण्यात व्यक्तीने दुकानाचे कुलुप तोडून दुकानात असणारी रोख रक्कम पंचवीस हजार चोरुन नेली आहे. शनिवार दि.२३ रोजी सकाळी चौधरी दुकान उघड़ण्यास गेले असता. दुकानाचे कुणीतरी कुलुप तोडून दुकानात असणारी रोख रक्कम चोरल्याचे लक्षात आले. दुकान कोकरुड रत्नागीरी जाणार्‍या मुख्य मार्गावर असुन  देखील चोरट्यानी डला मारला हे विशेष !चौधरी यांनी घटनेची तक्रार कोकरुड पोलिसात दाखल केली असून ...
Image
भीम आर्मी पदाधिकाऱयांनी जपली  सामाजिक बांधिलकी . कराड - प्रतिनिधी      कारणामुळेच संपूर्ण जग तसेच संपूर्ण भारत हा लॉक डाउन आहे. यामुळे जनतेचा जनजीवन विस्कळीत झाले तसेच त्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. यातच मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सण जवळ आलेला आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून भीम आर्मीचे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी  व सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे यांनी कराडमधील प्रभाकर रिक्षा गेटवरील मुस्लिम बांधवांना शिरखुर्म्याचे साहित्य वाटप केले.                 
Image
शिराळा तालुक्यात  मोहरे येथील एकजण कोरोना पाॅझीटीव्ह. शिराळा- प्रतिनिधी (आनंदा सुतार )  शिराळा तालुक्यातील  मोहरे येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे .मोहरे येथे मुंबई (विक्रोळी )हून दि. १६ मे ला हे कुंटुब गावात आले होते  त्यातील  ५० वर्षीय वृद्धास  कोरोनाची लागण झाली असुन  या कुटुंबातील १२ लोकांना गावातच घरी होम क्वारंटाईन केले होते. चार दिवसा पुर्वी त्यांच्यातील एक जण शेडगेवाडी येथील खाजगी दवाखन्यात  ताप आला असल्याचे सांगुन औषध मागण्यासाठी आला होता पण डाॅक्टरांनी औषधे न देता सरकारी दवाखन्यात जाण्याचा सल्ला दिला व त्यांपैकी एकाला जास्त त्रास होऊ लागल्याने चरण येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात जावुन तपासणी केली असता ताप व खोकला असल्याचे व कोरोना रोगाची प्राथमीक लक्षणे आढळल्याने त्यांना  मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्यांचा कोरोना चाचणी अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. शिराळा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. मोहरे येथील त्या वृद्धाच्या संपर्कात असलेल्या बारा जणांना शिराळा येथे आयटीआय येथे संस्थात्मक अलगीकरण रात्री करण्यात...
Image
कोकरुड ग्रामिण रुग्णालयाची नविन इमारत आगोदर उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती ! मात्र आता डाॅक्टरांच्या प्रतिक्षेत.             शिराळा -प्रतिनिधी(आनंदा सुतार) शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील नूतन ग्रामीण  रुग्णालय १ मे रोजी सुरू करण्याचे आदेश आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिले होते. मात्र आरोग्य विभागाने या आदेशाला  पाळलेल दिसून येत नाही त्यामुळे  रुग्णालय सुरू कधी होणार याचे वेध नागरीकांना व रुग्णांना लागले आहेत.  ग्रामिण भागात पुणे मुबंई व बाहेरील राज्यातुन गावाकडे येणार्‍यांचा लोढा वाढतच असुन कोरोना आता हळु हळु तालुक्यात पाय रोवत असुन लोकांच्यात भितीचे वातवरण  वाढतच असून मुंबई पुणे स्थित लोकांना ऑनलाइन पास दिले जात असून दररोज पश्चिम भागात बाहेरुन येणार्‍या  लोकांचा आकडा वाढत आहे.    कोरोनाच्या पार्दुभाने लोकांची गैरसोय होवुन संभाव्य धोका वाढु शकतो  या अंदाजाने आमदार नाईक यांनी कोकरुड येथील ग्रामीण रुग्णालयाची नूतन वास्तू १ मे रोजी सुरू करण्याचे आदेश दिले होते.  यावेळी तहसीलदार तसेच आरोग्य अधिकारी उपस...
Image
वाकुर्डे येथे बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू . शिराळा -प्रतिनिधी ( आनंदा सुतार) शिराळा वन परीक्षेत्रातील बिळाशी परीमंडळ 'अंतर्गत खुजगांव नियतक्षेत्रातील वाकुर्डे बुद्रुक ते पडवळवाडी डांबरी रस्त्यालगत वाकुर्डे बुद्रुक तालुका शिराळा येथे करमजाई मंदिराजवळ  अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या आठ ते दहा महिन्याच्या बिबट नर प्रजातीच्या प्राण्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडली असुन बिबट्या मृतावस्थेत आढळून आला याबाबत वनरक्षक देवकी तहसीलदार यांना  माहीती मिळाताच त्या अनुषंगाने अधिनस्थ वनपाल  सि.पी. देशमुख व कर्मचारी यांचे सह घटनास्थळावर पोहचुन  शहानिशा केली असता मृतदेहाचे सर्व अवयव शाबूत होते घटनास्थळाचे प्राथमिक तपासणी केली असता डांबरी रस्त्यावर रक्ताचे डाग व केस आढळले आहेत घटनास्थळाचा प्राथमिक पंचनामा व मृतदेह जप्तीचा पंचनामा करुन मृत प्राण्याच्या मृतदेहाचे शवचिकित्सा डाॅ.गावडे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी शिराळा यांनी केली . मृतदेहाचे अवशेष व मृतदेहाची व अवशेषांची विल्हेवाट अग्निसंस्कार करून करण्यात आली असुन सदर घ...
Image
अतुलबाबा समर्थक विजयराव शिंदे यांचा वहागावात गरजूंना मदतीचा हात. कराड- (प्रतिनिधी ) कोरोनाच्या  आपत्तीमुळे कराड तालुक्यातील अनेक गावात अनेकांची मोठी गैरसोय झाली. वहागाव (ता. कराड) येथील झोपडपट्टी परिसरातील मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करणार्‍या कुटुंबीयांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता, परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान याबाबतची माहिती कराड दक्षिणचे युवा नेते मा. डाॅ. अतुल भोसले (बाबा) यांचे विश्वासू व निष्ठावंत समर्थक, घोणशी गावचे युवा नेते मा. विजयराव शिंदे यांना समजली. त्यांनी वहागाव झोपडपट्टीतील गरजू लोकांच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकीतून वहागाव झोपडपट्टीतील गोरगरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट देऊन मदतीचा हात देण्याचे नियोजन केले. त्यानुसार त्यांनी आज (गुरुवारी) सायंकाळी उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांच्या हस्ते सुमारे ३० कुटूंबासाठी हे जीवनावश्यक वस्तूंचे कीट सुपूर्द केले. यावेळी युवा नेते मा. विजयराव शिंदे मिञ परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते. या जीवनावश्यक कीटमध्ये १० किलो गहू, ५ किलो तांदूळ,...
Image
शिराळ्यात आज आणखी एक रुग्ण पाॅझिटीव्ह सापडला. शिराळा -तालुका प्रतिनिधी (आनंदा सुतार ) सांगली दि.१९ (जि.मा. का.) अंत्री खुर्द तालुका शिराळा येथील ४२ वर्षीय पुरुष मुंबई येथून दिनांक १७ रोजी आला आहे या व्यक्तीची मुंबई येथे स्वाब तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रुग्णालयाला प्राप्त झाला. हा अहवाल जिल्हा प्रशासनाला आज रोजी प्राप्त झाला असून तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदरची व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची खात्री करून घेतली आहे .या व्यक्तीला मिरज येथे आसोलेशन कक्षात आणण्यात येत असून या व्यक्तीची मिरजकोविड लॅब  येथे पुनश्च स्वब घेऊन खात्री करण्यात येणार आहे.  तसेच निकटवर्तीयांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व अनुषंगिक उपाययोजना करण्यात येत आहेत .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
Image
चांदोली धरणात  ७.१९ टीएमसी पाणी साठा शिल्लक. महिन्यांत ५.५३ टीएमसी पाण्याचा वापर       शिराळा प्रतिनिधी(आनंदा सुतार) चांदोली धरणात  १४.०७ टीएमसी पाणीसाठा असून यातील मृत पाणीसाठा ६.८८ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा केवळ ७.१९ टीएमसी इतका शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा  २.३८ टीएमसीने अधिक आहे .गतवर्षी आजच्या तारखेचा उपयुक्त पाणीसाठा ४.८१ टीएमसी इतका होता . गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक असला तरी दिवसेन दिवस उन्हाळा वाढू लागला आहे त्यामुळे पाण्याचा वापरही अधिक होऊ लागला आहे . गेल्या सहा  महिन्यांत सहा टीएमसी पाण्याचा वापर झाला होता तर फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत तब्बल ८.६३ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे .तर आता १७ एप्रिल ते १७ मे या एका महिन्यात सर्वाधिक ५.५३ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे .सध्या धरणातून १६१५ कयुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे दिवसेंन दिवस पाण्याची मागणीही वाढू लागली आहे त्यामुळे आज १९ मे ते पुढे १९ जून या एका महिन्यात धरणातून किमान ६ टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे त्यामुळे धरणात केवळ एक टीएमसी उ...
Image
ग्रामिण भागातील यात्रा रद्द झाल्याने छोट्या मोठ्या व्यापार्‍याच्या उलाढालीला लागला ब्रेक. आर्थिक गणित कोलमडले, होलसेल व्यापारी पैशासाठी तगादा लावु लागलेत.    शिराळा-  प्रतिनिधी  (आनंदा सुतार ) संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे  त्यातच राज्य सरकारने राज्यात कोरोनाच्या पार्शवभूमीवर यात्रा-जत्रा, सण, उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला  यात्रा हंगाम सुरु होण्याच्या काळातच मागील दोन महीन्यापासून ग्रामीण भागात सर्वत्र  लाॅकडाऊन असल्याने  छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे कंबरडे अक्षरशा मोडले आहे किरकोळ व्यवसाय करणार्‍यांन समोर सध्या जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला असून,  जवळपास  प्रत्येक व्यापार्‍याची उलाढाल कोरोनाच्या महामारीने  यात्रा  ऐन वेळी रद्द केल्याने  आर्थिक गणित कोलमडले आहे. शिराळा तालुक्यातील व बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या या निर्णयामुळे मोठा हादरा बसला असून, जवळपास सर्वच व्यावसायीक अडचणीत सापडले आहेत. बराचसा व्यापारी वर्ग हा शेती नसनारा मजुर वर्ग...
Image
क्वारंटीनचा नवा कोल्हापुरी पॅटर्न करताहेत खासदार धैर्यशिल माने. निगेटिव्ह अहवालानंतर घरीच सोय, घरचे सदस्य राहणार भावकीत.   शिराळा - आनंदा सुतार दि. १८ (जि. मा.का. कोल्हापुर)  : रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरण व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशिल माने हे गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नवा कोल्हापुरी पॅटर्न विकसित करत आहेत. निगेटिव्ह अहवालानंतर संबंधितांची त्यांच्या घरीच राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी रहायचे. शाहुवाडी-पन्हाळा तालुक्यापासून याची सुरूवात होणार आहे.        रेड झोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातून बऱ्याचशा प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोक येत आहेत. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुढील 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण करावे लागते. यावर पर्याय शोधून खासदार धैर्यशिल माने यांनी नवा पॅटर्न करण्यास प्रारंभ केला आहे. ते म्हणाले, अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ...
Image
किनरेवाडी येथे  विद्युत वाहीनीचा शाॅॅक लागून काम करणारा मिस्त्री  जखमी. उपचारासाठी चरण येथे खासगी दवाखान्यात दाखल.         शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार ) किनरेवाडी ता.शिराळा येथे नविन घराचे बांधकाम सुरु असुन मिस्त्री राजू दगडू सुतार वय २६ रा.चरण यास ११ केव्ही विद्युत  वाहिनीचा शॉक लागून तो जखमी झाला असून त्याला चरण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.  घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, किनरेवाडी येथील बाबासो बापू किनरे यांच्या नवीन घराचे काम सुरु आहे काम अंतिम टप्यात असुन अवकाळी आलेल्या पावसामुळे घरावरील पत्रे बसवायचे काम शिल्लक होते.शनिवारी पावसाने थोडी उघडीप दिल्याने सकाळी पत्रे बसवण्याच्या कामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. नविन बांधकाम सुरु असलेल्या घरावरूनच  महावितरणची  विद्युत वाहिनी गेली असून, या वाहिनीच्या खाली चार ते पाच फूट अंतरावर घरावर  बसलेले मिस्त्री  यांचा विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श त्यांना झाला आणि ते काही सेकंद तिथेच अडकून राहिले या वेळी प्रसंग अवधान राखून ...
Image
चरण येथे शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला. नशीब बल्वत्तर बळीराजा थोडक्यात बचावला. शिराळा  -प्रतिनिधी  (आनंदा सुतार )  वन क्षेत्राचे लगत शेती क्षेत्रात  बिबट्या या वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याची घटना चरण ता. शिराळा येथे घडली आहे.येथील राजू कोंडीबा शिंगमोडे वय ३४ हा शेतातील मका काढण्यासाठी गेला असता आगोदरच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला करून जखमी केले.  ही घटना शनिवारी सकाळी साडे आठ वाजता  घडली असुन परीसरातील नागरीक भयभीत झाले आहेत.       घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राजू शिंगमोडे हे पत्नी कल्पना व अमोल चोरमारे हे तिघेजण चरण येथील  खंडाच्या नामक शेतात मका काढण्यासाठी कुंटुबा समवेत गेले होते. सर्वजण मका काढत असताना राजु ज्या मक्याच्या  सरीत बसले होते त्यांच्याच समोरच्या सरीत  बिबट्या आगोदरच  बसला होता. राजु यांना बिबट्या समोर बसलेला दिसला पण  काही समजण्या आगोदरच सरीत बसलेल्या बिबट्याने उडी मारून राजुच्या हाताचा चावा घेतला. शेजारीच त्यांची पत्नी व अमोल यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने मात्र धुम ठो...
Image
कोडोली ग्रामपंचायती मार्फत कोरोनाशी लढण्यासाठी आधुनिक वैद्यकीय किटचे वितरण. कार्वे प्रतिनिधी :-                       कोडोली ता. कराड येथील आरोग्य केंद्रातील आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचे पथक रोज घरोघरी सर्वे करत आहे.या पथकाकडून सर्दी ,ताप, खोकलासह सारीच्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे. यांना ग्रामपंचायत कोडोली विविध सुविधा पुरवत असून नुकतेच डिजिटल थर्मामीटर, पीपीई किट आधी सामग्री देण्यात आली आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्राचे काम आणखी अचूक व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे.              कराड लगतच्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे कोडोली गावात रोज घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्याचे काम कोडोली आरोग्य केंद्रामार्फत केले जात आहे .या मध्ये आशासेविका,अंगणवाडी सेविका, आरोग्य केंद्रांचे मॅडम असे एकूण बारा सेविका यासाठी काम करत आहेत .त्यात वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत .हे कर्मचारी घरोघरी भेटी देऊन रुग्णांची माहिती घेत आहेत.         ...
Image
पत्रकारच धावुन आला पत्रकारांच्या मदतीला. " विजय गराडे यांच्याकडुन गरजु पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप" शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार ) शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय गराडे यांनी स्वखर्चाने तालुक्यातील गरजु पत्रकारांना शिराळा तहसीलदार गणेश शिंदे  यांच्या हस्ते जिवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले . कोरोनाच्या संकटामध्ये पत्रकारच पत्रकाराच्या मदतीला धावून आला. सध्या कोरोनामुळे अनेक जण घरीच आहेत. परिणामी छोटे मोठे उद्योगधंदे अडचणीत आले असुन काहींनी नोकर्‍या गमावल्या आहूत. तर काहींची उपासमार सुरु आहे. समाजातील अनेक दानशूर  व्यक्ती, राजकीय नेते, समाजीक संघटना आप आपल्या परिने गरजूंना मदत करत आहेत. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. या कोरोनाचा फटका पत्रकारीतेलाही बसला आहे. अनेक दैनिके, साप्ताहीके, मासिके अपवाद वगळता बंद आहेत. आज लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे अनेक दैनिकातील पत्रकार यांनाही मदतीची गरज आहे. याचाही विचार इतर दानशूर व्यक्तींनी केला पाहीजे.  काही पत्रकारांचा संसार या पत्रकारीतेवरच अवलंबून आहे.  परंतु या कोरोनामुळे पत...
Image
बहरलेल्या रानमेव्याला कोरोनामुळे  "वैशाख वणवा"   शिराळा- प्रतिनिधी (आनंदा सुतार) कोरोनाच्या माहामारीमुळे व लाॅकडाऊन मुळे तसेच वैशाख महिन्याची चाहूल लागतानाच रणरणत्या उन्हाच्या झळांनी ग्रामीण भाग हैराण झाला आहे. डोंगर पठारावर राहणारा व रानोमाळ फिरून "रानमेवा' गोळा करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करणारे बांधव हवालदिल झाले आहेत.  वैशाख सुरू झाला की पर्यटक "डोंगरची काळी मैना' करवंदाचा व अशा अनेक फळांचा स्वाद घेण्यासाठी शिराळा व शाहुवाडी तालुक्याच्या  पश्चिम विभागात आर्वजुन हजेरी लावतात. पूर्वी तालुक्यात प्रत्येक डोंगरावर रानमेवा बहरायचा. परंतु झाडांची होणारी कत्तल, डोंगरावरील वणव्यांमुळे रानमेवा कमी झाला आहे. बोर, करवंद, जांभळे, आंबोळी, तुती, आंबे या सारखा रानमेवा आता दुर्मिळ होत आहे. पूर्वी सर्वत्र दिसणारा रानमेवा आता ठराविक ठिकाणीच दिसत आहे. बाजारात, गल्ली-बोळात, शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी रानमेवा विक्रेते दिसायचे. काही महिला डोक्‍यावर टोपली घेऊन रानमेवा विकताना दिसायच्या. हल्ली मात्र हे चित्र दुर्मिळ झाले. डोंगरांना ल...
Image
अनं शेडगेवाडीत ग्राहक उतरले रस्त्यावर.   " लाॅकडाऊनच्या शिथीलतेनंतर  बाजारपेठ  सुरु".   शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार)  लाॅकडाऊनमध्ये शिथीलता आणुन बाजारपेठेला चालु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर मंळवारी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी बाजार पेठेत  खरेदी साठी नागरीक रस्त्यावर उतरल्याचे दिसुन आले. सकाळी  नऊ नंतर रस्त्यावरील वर्दळ वाढली होती. मंगळवारी दिवसभर अनेक ठिकाणी व्यवहार सुरू झाल्याचे दिसून आले तब्बल ४५ दिवसानंतर शिराळ्यामध्ये वेगळाच उत्साह दिसून येत होता.  सुनसान असणारे रस्ते पूर्ण वर्दळीत हरवल्याचे  दिसून आले. सकाळी नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते शेडगेवाडीतील विविध प्रकारची दुकाने,  सुरू करण्यास  सशर्त परवानगी देण्यात आली आहे. परंतु हाॅटेल,चहा विक्री,वडापाव गाडी,यांना मात्र परवानगी नाकारली आहे.त्यामुळे आज अनेकांनी आपल्या दुकानाची  स्वच्छता केली .आवश्यक वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले मोबाईल ,इलेक्ट्रिक, इलेट्राॅनिक दुकाने, गॅरेज , स्टेशनरी, कापड दुकान, चप्पल दुकान,तसेच किरकोळ वस्त...
Image
श्री जोतिबा देवाचा भंडारा व यात्रा कोडोली.  कार्वे - प्रतिनिधी श्री जोतिबा देवाचा भंडारा व यात्रा कोडोली.दि.05/05/2020 रोजी होणार होता.पण जगावर थैमान घातलेल्या कोरोना मुळे श्री जोतिबा देवाचा भंडारा देवस्थान कमिटीने मिटिंग मध्ये निर्णय घेण्यात आला कि कराड तालुका रेड झोनमध्ये असल्या मुळे सदर होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे ठरवले आहे. फक्त दोन व्यक्ती सकाळी पहाटे चार वाजता गंगा पुजन करण्यास गेल्या व पुजारी यांनी देवाचे पुजन केले. भाविकांनी पुरण पोळी चा नैवेद्य घरातुनच देवाला दाखवण्यांत आला. होणारा महाप्रसाद व पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.                             
Image
दुशेरे ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण गाव केले लॉक डाउन. कार्वे -प्रतिनिधी कराड तालुक्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून दुशेरे तालुका कराड येथील ग्रामपंचायत व कोरोणा कमिटी व ग्रामस्थांनी दुशेरे गावातील येणारे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्याचा व तसेच ग्रामस्थांनी घरातून बाहेर न येण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी दुशेरेचे सरपंच सुमन जाधव उपसरपंच मनीषा जाधव पोलीस पाटील संदीप जाधव ग्रामसेविका जयश्री नलवडे व ग्रामपंचायत सदस्य अधिकराव जाधव व कोरोना कमिटी सदस्यांनी प्रशासनाच्या  नियमाचे उल्लंघन करील त्याच्यावर  खडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी गावांमध्ये फिरून नागरिकांना सूचना देण्यात आली आहे कराड तालुक्यातील परिसरातील गावांमध्ये कोरोना विषाणुची व्याप्ती वाढू लागल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर कराडपासुन पासून १० किलोमीटर अंतरावर असलेले दुशेरे येथील ग्रामपंचायत व कोरोणा कमिटीने व ग्रामस्थांनी कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्यांची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून घरातून बाहेर न पडण्याचा तसेच  बाहेरूगावा ...
Image
संकट काळात सचिन पाटील यांचा माणुसकीचा हात. "सचिन पाटील मित्र परिवाराकडून कार्वे नाका व  गोळेश्वर परिसरातील १२५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे किट घरपोच वाटप केले"  कार्वे - प्रतिनिधी . सध्या कराड तालुका मध्ये कोरोणा विषाणुच्या संसर्गजन्य रोगामुळे कराड व मलकापूर सह परिसरातील अकरा गावा वरती मोठे संकट कोसळले आहे सबंध तालुक्यातील लोक आपल्या जीवाची काळजी घेत प्रचंड दहशतीखाली आहेत सध्या कराड मलकापुरसह ११गावांमध्ये पूर्णपणे शंभर टक्के लाकडाऊन असल्यामुळे अशा परिस्थितीत कार्वे नाका येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील व त्यांच्या मित्रपरिवार विविध समाजातील निराधार गरीब व गरजू लोकांना आधाराचा हात देण्याचे काम सचिन पाटील यांच्या मदतीने करत आहेत सध्या कराड मलकापूरसह ११ गावांमध्ये १०० टक्के लाकडाऊन असल्यामुळे कार्वे नाका व गोळेश्वर परिसरात असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा घरामध्ये कमतरता भासत असताना सचिन पाटील यांच्या माध्यमातून कार्वे नाका व गोळेश्वर परिसरातील सुमारे 125 कुटुंबांना पाच किलो आटा तीन किलो तांदूळ दोन किलो बटाटा दोन किलो कांदा एक किलो तेल एक किलो साखर चहा  पावडर तु...
Image
राहुल पाटील यांनी  होणाऱ्या पत्नीसोबत जपला सामाजिक बांधिलकीचा वसा. "मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांची मदत"     शिराळा- प्रतिनिधी(आनंदा सुतार)      जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासन   कसोटीचे प्रयत्न करत आहेत.कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉक डाऊन असल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यात राज्य शासनाच्या तिजोरीवर ही ताण पडत आहे .या लढ्यामध्ये घरी बसून लढत असताना दानशूर व्यक्ती पुढे येत मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हाताने मदत करत आहेत. अशातच आणखी एक दानशुर व्यक्तीमत्व समोर आले आहे, भारतीय वन सेवेत २०१४ च्या तुकडीतील अधिकारी म्हणून निवड झालेले सांगली जिल्ह्याचे सुपुत्र राहुल पाटील यांनी त्यांचा विवाह साधेपणाने करत सामाजिक बांधिलकीचे भान जपले असुन  मुख्यमंत्री सहाय्यता कोविड खात्यास  एक लाख रुपयाचा निधी जमा केला आहे लाॅकडाऊनमुळे सण-समारंभ सामाजिक धार्मिक कार्यक्रम यावर बंदी  राज्यात सध्या सुरू असून संचारबंदी ही आहे  सांगली जिल्ह्यातील शिराळा तालु...