वाकुर्डे येथे बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू .
शिराळा वन परीक्षेत्रातील बिळाशी परीमंडळ 'अंतर्गत खुजगांव नियतक्षेत्रातील वाकुर्डे बुद्रुक ते पडवळवाडी डांबरी रस्त्यालगत वाकुर्डे बुद्रुक तालुका शिराळा येथे करमजाई मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या आठ ते दहा महिन्याच्या बिबट नर प्रजातीच्या प्राण्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडली असुन बिबट्या मृतावस्थेत आढळून आला याबाबत
वनरक्षक देवकी तहसीलदार यांना माहीती मिळाताच त्या अनुषंगाने अधिनस्थ वनपाल सि.पी. देशमुख व कर्मचारी यांचे सह घटनास्थळावर पोहचुन शहानिशा केली असता मृतदेहाचे सर्व अवयव शाबूत होते घटनास्थळाचे प्राथमिक तपासणी केली असता डांबरी रस्त्यावर रक्ताचे डाग व केस आढळले आहेत घटनास्थळाचा प्राथमिक पंचनामा व मृतदेह जप्तीचा पंचनामा करुन
मृत प्राण्याच्या मृतदेहाचे शवचिकित्सा डाॅ.गावडे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी शिराळा यांनी केली . मृतदेहाचे अवशेष व मृतदेहाची व अवशेषांची विल्हेवाट अग्निसंस्कार करून करण्यात आली असुन सदर घटना अज्ञात वाहनाने बिबट प्राण्यास धडक देऊन घडल्याचे घटनास्थळाची परिस्थिती व प्राथमिक तपास करून निदर्शनास येत आहे असे शिराळा वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी सांगितले. या बाबत वन गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाची पुढील चौकशी पी.बी. धानके वनसंरक्षक ,वन विभाग सांगली, जी.एस. चव्हाण सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण सांगली यांच्या मार्गदर्शनात सुशांत काळे वनक्षेत्रपाल शिराळा, चंद्रकांत देशमुख वनपाल बिळाशी, वनसंरक्षक सचिन पाटील,देवकी तहसीलदार ,प्रकाश पाटील व सहकारी करत आहेत.
यापूर्वी शिराळा तालुक्यात सात व वाळवा तालुक्यात एक अशा आठ बिबट्यांचा मृत्यू झाला होता. आज वाकुर्डे येथे बिबट्याचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या बिबट्यांची संख्या नऊ झाली आहे.
![]() |


Comments
Post a Comment