शिराळा तालुक्यात  पावसाने हजेरी लावुन मान्सुन आगमनाची जणु सलामीच दिली.

 शिराळा - प्रतिनिधी( आनंदा सुतार) 

शिराळा तालुक्यात खुजगांव, शेडगेवाडी ,आरळा गुढे  परिसरात  तसेच  तालुक्यात इतर ठिकाणी ही पावसाने विजांच्या गडगडाटासह हजेरी लावली. परिसरात दुपारी दोन वाजल्यापासून  पावसाने सुरुवात केली असल्याने शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडाली मात्र उकाड्याने हैरान झालेल्यांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. तर शेतकर्‍यांनी उन्हात घातलेले वाळवण काढताना सर्वांची कसरत झालेली पहावयास मिळाली. तसेच काही ठिकाणी भात पेरणी चालु असुन बळीराजाची मात्र धादल आलेल्या पावसाने केली.काही नी पेरणी अर्धवट सोडुन घर गाठले. यंदा मान्सुन दाखल वेळेवर होत आहे पण गत वर्षा सारखा दिड महिना हुलकावणी दाखवेना म्हणजे बरं असे मत परीसरातील शेतातुन घरी येणार्‍या झाडा खाली आडोशाला थांबलेल्या बळीराजाचे गुपचुप चर्चात्मक विषय ऐकावयास मिळत होते.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .