अनं शेडगेवाडीत ग्राहक उतरले रस्त्यावर.
"लाॅकडाऊनच्या शिथीलतेनंतर बाजारपेठ सुरु".
शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार)
लाॅकडाऊनमध्ये शिथीलता आणुन बाजारपेठेला चालु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर मंळवारी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी बाजार पेठेत खरेदी साठी नागरीक रस्त्यावर उतरल्याचे दिसुन आले. सकाळी नऊ नंतर रस्त्यावरील वर्दळ वाढली होती. मंगळवारी दिवसभर अनेक ठिकाणी व्यवहार सुरू झाल्याचे दिसून आले तब्बल ४५ दिवसानंतर शिराळ्यामध्ये वेगळाच उत्साह दिसून येत होता. सुनसान असणारे रस्ते पूर्ण वर्दळीत हरवल्याचे दिसून आले. सकाळी नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते शेडगेवाडीतील विविध प्रकारची दुकाने, सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. परंतु हाॅटेल,चहा विक्री,वडापाव गाडी,यांना मात्र परवानगी नाकारली आहे.त्यामुळे आज अनेकांनी आपल्या दुकानाची स्वच्छता केली .आवश्यक वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले मोबाईल ,इलेक्ट्रिक, इलेट्राॅनिक दुकाने, गॅरेज , स्टेशनरी, कापड दुकान, चप्पल दुकान,तसेच किरकोळ वस्तू विक्रेत्यांनी ही आपली दुकाने उघडल्याचे दिसुन आले. आवश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी मात्र प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्याचे दिसून आले. मास्क वापरूनच नागरिक सर्व व्यवहार करताना दिसत होते. शिवाय बऱ्याच दिवसानंतर व्यवहार पूर्ण सुरू झाल्याने दुकानदारांनी सुटकेचा निश्वास टाकला दरम्यान सलून दुकाने ही सुरू करण्यात आली आहेत. तेथे सोशल डिस्टन्सिंचे पालन करून नागरिकांना सेवा पुरवण्यात येत होती.
परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता महिना भरा पासून बराच काळ बंद असणारे बहुतांशी व्यापार व्यवहार सोमवारी सुरू झाले. त्यामुळे थांबलेली अर्थचक्र लवकरच सुरळीत होतील असे आशेचे संकेत मिळत आहेत .

Comments
Post a Comment