राहुल पाटील यांनी  होणाऱ्या पत्नीसोबत जपला सामाजिक बांधिलकीचा वसा.

"मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांची मदत"




    शिराळा- प्रतिनिधी(आनंदा सुतार)

     जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासन   कसोटीचे प्रयत्न करत आहेत.कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉक डाऊन असल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यात राज्य शासनाच्या तिजोरीवर ही ताण पडत आहे .या लढ्यामध्ये घरी बसून लढत असताना दानशूर व्यक्ती पुढे येत मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हाताने मदत करत आहेत. अशातच आणखी एक दानशुर व्यक्तीमत्व समोर आले आहे,
भारतीय वन सेवेत २०१४ च्या तुकडीतील अधिकारी म्हणून निवड झालेले सांगली जिल्ह्याचे सुपुत्र राहुल पाटील यांनी त्यांचा विवाह साधेपणाने करत सामाजिक बांधिलकीचे भान जपले असुन  मुख्यमंत्री सहाय्यता कोविड खात्यास  एक लाख रुपयाचा निधी जमा केला आहे लाॅकडाऊनमुळे सण-समारंभ सामाजिक धार्मिक कार्यक्रम यावर बंदी  राज्यात सध्या सुरू असून संचारबंदी ही आहे  सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कणदूर (बिळाशी)या गावचे सुपुत्र असून ते सध्या बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे संचालक या पदावर कार्यरत आहेत  राहुल पाटील आणि कराडच्या तेजस्विनी साळुंखे यांच्या लग्नाचा मुहूर्त लॉकडाऊन पूर्वी दोन मे रोजी ठरला होता मात्र लाॅकडाऊन  वाढल्याने लग्नसोहळा रखडला लग्नाच्या पहिल्या मुहूर्ताची आठवण म्हणून दोन्ही कुटुंबीयांनी मिळून एक लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली लाॅकडाऊन जाहीर होण्यापूर्वी त्यांचा विवाह कराडच्या एमबीए झालेल्या तेजस्विनी साळुंखे यांच्याशी निश्चित झाला होता दरम्यानच्या काळात त्यांच्या साक्षगंध ही झाला मात्र कोरोनाच्या संचारबंदी मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. "वर चंद्रपुरात आणि  वधू साताऱ्यात" असल्याने दोन मे च्या मुहूर्तावर लग्नसोहळा पार पडणे अशक्य होते.वधू आणि वर पक्षाने लग्न खर्चातील प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे एक लाख रुपये कोरोना महामारी साठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑनलाइन जमा केले . त्यांचे वडील  सेवा निवृत्त वैद्यकिय अधिकारी आहेत.तर आई गृहीण असुन
 या दोघांचं कौतुक जास्त वाटतय ,त्याच कारणही तसंच आहे.खरं तर सध्या कोरोना नसता तर राहुल  आणि तेजस्विनी या नवदापत्यांचा विवाह २मे रोजी अगदी थाटामाटाने संपन्र झाला असता. पण लग्नाच्या
तारखेची आठवण म्हणून  मदत  करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. या नवदापत्यांचा वेगळा अंदाज नक्कीच समाजासाठी आदर्श आहे. या दोघांनी सांगली व सातारा जिल्ह्यमध्ये स्वराज्य फाउंडेशन व माई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून  ७०० लीटर सॅनिटायझर व ७०००मास्क चे ही वितरण केले अाहे. तसेच बांबूवर आधारित रोजगार करणार्‍या लोकांना आर्थिक झळ बसू नये म्हणून राहुल पाटील यांनी चंद्रपूरमध्ये वर्क फ्राॅम होम फॉर बांबू ही कल्पना ही राबवली आहे.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .