बहरलेल्या रानमेव्याला कोरोनामुळे "वैशाख वणवा"
कोरोनाच्या माहामारीमुळे व लाॅकडाऊन मुळे तसेच वैशाख महिन्याची चाहूल लागतानाच रणरणत्या उन्हाच्या झळांनी ग्रामीण भाग हैराण झाला आहे. डोंगर पठारावर राहणारा व रानोमाळ फिरून "रानमेवा' गोळा करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करणारे बांधव हवालदिल झाले आहेत. वैशाख सुरू झाला की पर्यटक "डोंगरची काळी मैना' करवंदाचा व अशा अनेक फळांचा स्वाद घेण्यासाठी शिराळा व शाहुवाडी तालुक्याच्या पश्चिम विभागात आर्वजुन हजेरी लावतात. पूर्वी तालुक्यात प्रत्येक डोंगरावर रानमेवा बहरायचा. परंतु झाडांची होणारी कत्तल, डोंगरावरील वणव्यांमुळे रानमेवा कमी झाला आहे. बोर, करवंद, जांभळे, आंबोळी, तुती, आंबे या सारखा रानमेवा आता दुर्मिळ होत आहे.
पूर्वी सर्वत्र दिसणारा रानमेवा आता ठराविक ठिकाणीच दिसत आहे.
बाजारात, गल्ली-बोळात, शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी रानमेवा विक्रेते दिसायचे. काही महिला डोक्यावर टोपली घेऊन रानमेवा विकताना दिसायच्या. हल्ली मात्र हे चित्र दुर्मिळ झाले. डोंगरांना लागणाऱ्या वणव्यामुळेही रानमेवा घटला. वृक्षतोडीनेही रानमेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
डोंगर दर्यात राहणार्या ठराविक समाजासाठी हा रान मेवा उदरनिर्वाहाचे साधन असुन महिला वर्ग डोंगर, टेकड्या, कपारीत जाऊन रानमेवा गोळा करतात. अनेकदा करवंदाच्या जाळ्यामुळे इजा होते. रानमेव्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. कष्टाच्या तुलनेने या समाजाला विक्री पश्चात अपेक्षित भाव ही मिळत नाही.
रानमेव्याच्या प्रत्येक फळांचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. रानमेवा गुणकारी व त्याची चवही तृप्त करणारी आहे. डोंगरची "काळी मैना आली रे' या सूरातच चांदोली परिसरात रानमेव्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असे. मात्र गेल्या काही वर्षांत रानमेव्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
डोंगरची काळी मैना.. आली हो’..."करवंद घ्या करवंद ! जाभंळ घ्या जांभळ "अशी आरोळी घुमली, की घरा घरांतून करवंद जाभंळ घेण्यासाठी लगबग उडायची. काळ्या मैनेचं हे कौतुक सध्या फक्त वाट्या वाट्यांनी मंडईत विकायला बसलेलं दिसतं. करवंदां सह बोरं , रानजांभळं,आळू ,तोरणं,रायआवळा,आंबा फणस, अशा अस्सल मेव्यानं घमघमतं आहे.
उपनगरीय भागातून थोडं बाहेर पडलात, की या रानमेव्याची मजा मनसोक्त लुटता येईल.
आंबा, फणस आणि करवंद या पलीकडचा रानमेवा हल्ली फारसा माहिती नसतो आणि खाल्लाही जात नाही. रानमेव्यातल्या प्रत्येक फळाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. हा रानमेवा गुणकारी तर आहेच; पण त्याची चव रसना तृप्त करणारीही आहे. आंबे, करवंद, फणस हे शहरात मिळतातच; पण आळू, रानजांभळं, आंबोळ्या, तोरणं यांचा आस्वाद घेण्यासाठी थोडंसं बाहेरही पडायला हवं. साधारण अक्षय तृतीयेनंतर ही फळं पक्व होऊन खाण्यासाठी उपलब्ध होतात.पण यंदा या लाॅकडाऊनमुळे मात्र हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर डोंगरच्या काळया मैनेने बहरला असुन,परिसर पर्यटकांनविना ओस पडला आहे.शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर बारमाही हिरवळीने नटलेला असल्यामुळे पर्यटक नेहमी चांदोली परिसराला भेटी देत असतात.सध्या चांदोली परिसरातील जाधववाडी,बांबरवाडी,मणदुर धनगरवाडा,खुंदलापुर धनगरवाडा, आदी
परिसरात डोंगरची काळी मैना व डोंरचा रान मेवा करवंदे,जांभुळ,आळु,तोरण,डोंबल,फणस ही फळे परीपक्व झाली असुन,संपुर्ण परिसर फळांनी बहरुन गेला आहे.हि फळे एप्रिल,मे महीन्यात परिपक्व होत असतात.चालुवर्षी या परिसरात वादळी वारा पाऊस झाला नसल्याने हि फळे जास्त प्रमाणात दिसत आहेत.दिड महीन्यापुर्वी हिच फळे कच्ची असल्याने बालचमु कैरी, आंब्याचा आश्वाद घेत होते.माञ आता कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्वञ लाॅकडाऊन असल्यामुळे जणु परिपक्व फळे पर्यटकांची वाटच पहात आहेत.असेच चिञ दिसत आहे.



Comments
Post a Comment