शिराळा तालुक्यातील मणदूर येथे जनावरांच्या शेडला आग लागुन शेडसह शेती औजारे जळुन खाक.
अंदाजे एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान.
शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार)
शिराळा तालुक्यातील मणदूर येथील यशवंत केरु पाटील यांच्या जनावरांच्या शेडला गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान अचानक आग लागली.
आगीमध्ये शेडसह गवत,सायकल तीन,शेती औजारे,
इंजिन,पी.व्ही.सी.पाईप लाईन जळुन खाक झाली असुन अंदाजे 1 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.घटनेचा पंचनामा तलाठी भास्कर पाटील यांनी केला असुन,घटनास्थळी सरपंच वसंत पाटील,
उपसरपंच विजय चौगुले,पोलिस पाटील पांडूरंग बडेकर,ग्रामसेवक एम.एन.पाटील व ग्रामस्थ उपस्थीत होते.


Comments
Post a Comment