शेडगेवाडी येथे मुख्य चौकातील दुकानात चोरी.

शिराळा - प्रतिनिधी(आनंदा सुतार)
शेडगेवाडी ता. शिराळा येथील जयहिंद कटलरीचे दुकान फोडून चोरट्यांने दुकानातील पंचवीस हजाराची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली असून अज्ञात व्यक्तीवर कोकरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                  मेघराज सिखाराम चौधरी यांचे शेडगेवाडी फाटा या ठिकाणी जयहिंद कटलरीचे दुकान मागील तीन वर्षापासून आहे तो दुकानच्या वर पहील्या माळ्यावरच राहयला असुन देखील त्याला याची चाहुल लागली नाही .शुक्रवार दि.२२ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञण्यात व्यक्तीने दुकानाचे कुलुप तोडून दुकानात असणारी रोख रक्कम पंचवीस हजार चोरुन नेली आहे. शनिवार दि.२३ रोजी सकाळी चौधरी दुकान उघड़ण्यास गेले असता. दुकानाचे कुणीतरी कुलुप तोडून दुकानात असणारी रोख रक्कम चोरल्याचे लक्षात आले. दुकान कोकरुड रत्नागीरी जाणार्‍या मुख्य मार्गावर असुन  देखील चोरट्यानी डला मारला हे विशेष !चौधरी यांनी घटनेची तक्रार कोकरुड पोलिसात दाखल केली असून साहयक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांच्या मार्गदर्शनाखली पोलिस नाईक जाधव अधीक तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .