चांदोली धरणात ७.१९ टीएमसी पाणी साठा शिल्लक.
महिन्यांत ५.५३ टीएमसी पाण्याचा वापर
शिराळा प्रतिनिधी(आनंदा सुतार)
चांदोली धरणात १४.०७ टीएमसी पाणीसाठा असून यातील मृत पाणीसाठा ६.८८ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा केवळ ७.१९ टीएमसी इतका शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा २.३८ टीएमसीने अधिक आहे .गतवर्षी आजच्या तारखेचा उपयुक्त पाणीसाठा ४.८१ टीएमसी इतका होता .
गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक असला तरी दिवसेन दिवस उन्हाळा वाढू लागला आहे त्यामुळे पाण्याचा वापरही अधिक होऊ लागला आहे .
गेल्या सहा महिन्यांत सहा टीएमसी पाण्याचा वापर झाला होता तर फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत तब्बल ८.६३ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे .तर आता १७ एप्रिल ते १७ मे या एका महिन्यात सर्वाधिक ५.५३ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे .सध्या धरणातून १६१५ कयुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे दिवसेंन दिवस पाण्याची मागणीही वाढू लागली आहे त्यामुळे आज १९ मे ते पुढे १९ जून या एका महिन्यात धरणातून किमान ६ टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे त्यामुळे धरणात केवळ एक टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहणार आहे .असे चित्र सध्याच्या आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे.
धरणातील पाण्याची सध्याची वस्तुस्थिती विचारात घेता पावसाला वेळेत सुरवात झाली तर काही अडचण नाही मात्र उशीर झाला तर पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे या पाण्याचा काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे
सध्या धरणाची पाणीपातळी ६०१.९५ मीटर तर पाणीसाठा द.ल.घ.मीटर अर्थात (१४.०७ टिएमसी) इतका असून त्याची टक्केवारी ४०.८९ इतकी आहे.
विसर्ग १६१५ कयुसेक्स इतका आहे.
🔴 गतवर्षीची आकडेवारी
पाणी पातळी ५९८.३५ मिटर
टीएमसी ११.६९
उपयुक्त पाणीसाठा
४.८१ टीएमसी
विसर्ग १४०० कयुसेक्स
🔴आजची आकडेवारी
पाणी पातळी ६०१.९५ मिटर
टीएमसी १४.०७
उपयुक्त पाणीसाठा
७.१९ टीएमसी
विसर्ग १६१५ कयुसेक्स

Comments
Post a Comment