पत्रकारच धावुन आला पत्रकारांच्या मदतीला.

" विजय गराडे यांच्याकडुन गरजु पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप"

शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार )
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय गराडे यांनी स्वखर्चाने तालुक्यातील गरजु पत्रकारांना शिराळा तहसीलदार गणेश शिंदे  यांच्या हस्ते जिवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संकटामध्ये पत्रकारच पत्रकाराच्या मदतीला धावून आला. सध्या कोरोनामुळे अनेक जण घरीच आहेत. परिणामी छोटे मोठे उद्योगधंदे अडचणीत आले असुन काहींनी नोकर्‍या गमावल्या आहूत. तर काहींची उपासमार सुरु आहे. समाजातील अनेक दानशूर  व्यक्ती, राजकीय नेते, समाजीक संघटना आप आपल्या परिने गरजूंना मदत करत आहेत. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. या कोरोनाचा फटका पत्रकारीतेलाही बसला आहे. अनेक दैनिके, साप्ताहीके, मासिके अपवाद वगळता बंद आहेत.
आज लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे अनेक दैनिकातील पत्रकार यांनाही मदतीची गरज आहे. याचाही विचार इतर दानशूर व्यक्तींनी केला पाहीजे.  काही पत्रकारांचा संसार या पत्रकारीतेवरच अवलंबून आहे.  परंतु या कोरोनामुळे पत्रकारही अडचणीत आलेत. हीच गरज लक्षात घेवून मांगले ता.शिराळा येथील पत्रकार विजय गराडे यांनी गरजू पत्रकारांना स्वखर्चातून जिवनावश्यक वस्तूंचे किट देवून गरजु पत्रकारांच्या संसारासाठी हातभार लावला.
मांगले येथील पत्रकार व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विजय गराडे यांनी स्वखर्चातून शिराळा तालुक्यातील अकरा पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले. विजय गराडे यांनी गरजू पत्रकारांना केलेल्या मदती बद्दल पत्रकारांच्यातून कौतुक होत आहे.
यावेळी सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, शिवाजी चौगुले,आनंदा सुतार,अरुण पाटील, प्रा दिपक तडाखे, अजय जाधव, नवनाथ पाटील, दत्ता पाटील, रणजीत चव्हाण, मनोज मस्के, दत्तात्रय तडाखे, नवनाथ कुंभार, शिवाजी कुंभार, हिंदुराव पाटील, सुरेश पवार, अनिल झाडे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .