अतुलबाबा समर्थक विजयराव शिंदे यांचा वहागावात गरजूंना मदतीचा हात.


कराड- (प्रतिनिधी )
कोरोनाच्या  आपत्तीमुळे कराड तालुक्यातील अनेक गावात अनेकांची मोठी गैरसोय झाली. वहागाव (ता. कराड) येथील झोपडपट्टी परिसरातील मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करणार्‍या कुटुंबीयांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता, परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान याबाबतची माहिती कराड दक्षिणचे युवा नेते मा. डाॅ. अतुल भोसले (बाबा) यांचे विश्वासू व निष्ठावंत समर्थक, घोणशी गावचे युवा नेते मा. विजयराव शिंदे यांना समजली. त्यांनी वहागाव झोपडपट्टीतील गरजू लोकांच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकीतून वहागाव झोपडपट्टीतील गोरगरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट देऊन मदतीचा हात देण्याचे नियोजन केले.
त्यानुसार त्यांनी आज (गुरुवारी) सायंकाळी उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांच्या हस्ते सुमारे ३० कुटूंबासाठी हे जीवनावश्यक वस्तूंचे कीट सुपूर्द केले. यावेळी युवा नेते मा. विजयराव शिंदे मिञ परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते. या जीवनावश्यक कीटमध्ये १० किलो गहू, ५ किलो तांदूळ, साखर, चहा पावडर, रवा, चटणी, खाद्यतेल, तूरडाळ, मीठ आदी एका कुटुंबाला १ महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. वहागाव, वनवासमाची गावातील परिस्थिती नियंत्रणासाठी संबंधित प्रशासन काम करीत आहे. लवकरच ही परिस्थिती आटोक्यात येईल. मात्र ग्रामस्थांनी गावच्या हितासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन  विजयराव शिंदे  यांनी यावेळी केले. दरम्यान वहागाव गावाशी राजकीय दृष्ट्या काहीही संबंध नसताना केवळ सामाजिक बांधिलकीतून घोणशी येथील विजयराव शिंदे यांनी दाखविलेल्या सामाजिक दातृत्वाबदल परिसरातील ग्रामस्थांतून शिंदे यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .