दुशेरे ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण गाव केले लॉक डाउन.


कार्वे -प्रतिनिधी
कराड तालुक्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून दुशेरे तालुका कराड येथील ग्रामपंचायत व कोरोणा कमिटी व ग्रामस्थांनी दुशेरे गावातील येणारे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्याचा व तसेच ग्रामस्थांनी घरातून बाहेर न येण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी दुशेरेचे सरपंच सुमन जाधव उपसरपंच मनीषा जाधव पोलीस पाटील संदीप जाधव ग्रामसेविका जयश्री नलवडे व ग्रामपंचायत सदस्य अधिकराव जाधव व कोरोना कमिटी सदस्यांनी प्रशासनाच्या  नियमाचे उल्लंघन करील त्याच्यावर  खडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी गावांमध्ये फिरून नागरिकांना सूचना देण्यात आली आहे कराड तालुक्यातील परिसरातील गावांमध्ये कोरोना विषाणुची व्याप्ती वाढू लागल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर कराडपासुन पासून १० किलोमीटर अंतरावर असलेले दुशेरे येथील ग्रामपंचायत व कोरोणा कमिटीने व ग्रामस्थांनी कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्यांची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून घरातून बाहेर न पडण्याचा तसेच  बाहेरूगावा वरून येणारे रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान गावातील जीवनावश्यक वस्तू तसेच शेतीच्या कामासाठी ठराविक वेळ ठेवण्यात आला आहे त्यामध्ये  शेतातील कामे पूर्ण करून घेणे व उर्वरित वेळेमध्ये बाहेर न पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गावातील सर्व युवकांनी व कोरोना कमिटीने एकत्रित येऊन बाहेरून गावाहून येणारे सर्व रस्ते चैनी मळा, म्हसोबा मळा व गावचा मुख्य रस्ता अशा प्रकारचे तीन ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आली आहेत व त्या ठिकाणी नोंदवहीत ठेवून जे अत्यावश्यक सेवेसाठी काम करत असणारे कर्मचारी व आजारी रूग्णांसाठी गावच्या बाहेर  जाणाऱ्या ग्रामस्थांची वेळेची नोंद वहीत नोंद ठेवण्यात येते आहेत दरम्यान गावच्या रहिवाशी बाहेरील कोणी व्यक्ती गावात येणार नाही आणि गावची व्यक्ती कोणी बाहेर जाणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी ग्रामस्तरीय समिती व गावच्या युवकांनी उचलली आहे.




नागरिकांनी प्रशासनाचे सूचनांचे पालन करावे ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासन कोरोणा विरुद्ध विविध उपाय योजना राबवत आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून घरी थांबावे विनाकारण घराबाहेर पडू नये अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क व सानिटायझर वापर करावा असे अहवान गावच्या प्रथम नागरिक सरपंच सुमन जाधव यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .