चरण येथे शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला.

नशीब बल्वत्तर बळीराजा थोडक्यात बचावला.




शिराळा  -प्रतिनिधी  (आनंदा सुतार )

 वन क्षेत्राचे लगत शेती क्षेत्रात  बिबट्या या वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याची घटना चरण ता. शिराळा येथे घडली आहे.येथील राजू कोंडीबा शिंगमोडे वय ३४ हा शेतातील मका काढण्यासाठी गेला असता आगोदरच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला करून जखमी केले.
 ही घटना शनिवारी सकाळी साडे आठ वाजता  घडली असुन परीसरातील नागरीक भयभीत झाले आहेत.
      घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राजू शिंगमोडे हे पत्नी कल्पना व अमोल चोरमारे हे तिघेजण चरण येथील  खंडाच्या नामक शेतात मका काढण्यासाठी कुंटुबा समवेत गेले होते. सर्वजण मका काढत असताना राजु ज्या मक्याच्या  सरीत बसले होते त्यांच्याच समोरच्या सरीत  बिबट्या आगोदरच  बसला होता. राजु यांना बिबट्या समोर बसलेला दिसला पण  काही समजण्या आगोदरच सरीत बसलेल्या बिबट्याने उडी मारून राजुच्या हाताचा चावा घेतला. शेजारीच त्यांची पत्नी व अमोल यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने मात्र धुम ठोकली .तातडीने राजु यांना गावातीलच  प्राथमिक आरोग्य केंद्रात आणुन प्राथमिक उपचार डाॅ.शाहीद कादारी यांनी केले.राजुच्या उजव्या हाताच्या पंजावर जखम झाली असून  त्यांला मिरज येथील सिव्हिल हाॅस्पिटल येथे वन विभागाचे प्रतिनिधी सह पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
  सिव्हील हॉस्पिटलला जी .एस. चव्हाण सहाय्यक वनसंरक्षक सांगली वन विभाग यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे.
 या घटनेची माहिती मिळताच शिराळा वनक्षेत्रपाल सुशांत काळे ,वनसंरक्षक सचिन पाटील वनकर्मचारी लक्ष्मण झोळे ,शिवाजी पाटील,बाबसौ गायकवाड,आनंदा पाटील यांनी घटनास्थळाला भेट देवुन संपुर्ण परिसराची पहाणी केली आहे. तसेच
 जखमीला अतितातडीची आर्थिक मदत वन विभागामार्फत करण्यात आली आहे .

चरण व परिसरात बिबट्याचा संचार असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. वन्यप्राणी निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाला कळवून सहकार्य करावे व वन्य प्राणी पाहण्याकरता उत्सुकतेपोटी त्याचा शोध घेऊन पाठलाग करू नये व त्यांना पळवून लावू नये असे आव्हाहन यावेळी वन विभागामार्फत करण्यात आली आहे मागील दोन दिवसानं पासुन परीसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा नागरीकांच्यातुन यावेळी  ऐकावयास येत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .