शिराळ्यात आज आणखी एक रुग्ण पाॅझिटीव्ह सापडला.





शिराळा -तालुका प्रतिनिधी (आनंदा सुतार )
सांगली दि.१९ (जि.मा. का.) अंत्री खुर्द तालुका शिराळा येथील ४२ वर्षीय पुरुष मुंबई येथून दिनांक १७ रोजी आला आहे या व्यक्तीची मुंबई येथे स्वाब तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रुग्णालयाला प्राप्त झाला. हा अहवाल जिल्हा प्रशासनाला आज रोजी प्राप्त झाला असून तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदरची व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची खात्री करून घेतली आहे .या व्यक्तीला मिरज येथे आसोलेशन कक्षात आणण्यात येत असून या व्यक्तीची मिरजकोविड लॅब  येथे पुनश्च स्वब घेऊन खात्री करण्यात येणार आहे.
 तसेच निकटवर्तीयांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व अनुषंगिक उपाययोजना करण्यात येत आहेत .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .