कोकरुड ग्रामिण रुग्णालयाची नविन इमारत आगोदर उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती ! मात्र आता डाॅक्टरांच्या प्रतिक्षेत.


         

  शिराळा -प्रतिनिधी(आनंदा सुतार)
शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील नूतन ग्रामीण  रुग्णालय १ मे रोजी सुरू करण्याचे आदेश आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिले होते. मात्र आरोग्य विभागाने या आदेशाला  पाळलेल दिसून येत नाही त्यामुळे  रुग्णालय सुरू कधी होणार याचे वेध नागरीकांना व रुग्णांना लागले आहेत.
 ग्रामिण भागात पुणे मुबंई व बाहेरील राज्यातुन गावाकडे येणार्‍यांचा लोढा वाढतच असुन कोरोना आता हळु हळु तालुक्यात पाय रोवत असुन लोकांच्यात भितीचे वातवरण  वाढतच असून मुंबई पुणे स्थित लोकांना ऑनलाइन पास दिले जात असून दररोज पश्चिम भागात बाहेरुन येणार्‍या  लोकांचा आकडा वाढत आहे.
   कोरोनाच्या पार्दुभाने लोकांची गैरसोय होवुन संभाव्य धोका वाढु शकतो  या अंदाजाने आमदार नाईक यांनी कोकरुड येथील ग्रामीण रुग्णालयाची नूतन वास्तू १ मे रोजी सुरू करण्याचे आदेश दिले होते.
 यावेळी तहसीलदार तसेच आरोग्य अधिकारी उपस्थित होते. पणआज २२ मे उजाडला तरी ही या ठिकाणी ओ पी डी सुरू करण्यात आली नसल्याने " ग्रामिण रुग्णालयच रामभरोसे "  चालत असल्याचा प्रत्यय आला असुन याला जबाबदार वाली कोण असा सवाल येथे येणार्‍या रुग्णासह नागरीकांना पडला आहे. कोकरुड येथे बरेच वर्षे जुन्या एकाच इमारतीत  प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सुरू असून याचा  गैर फायदा आरोग्यअधिकार्‍यांनी घेतल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या जोडीला प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सध्या दोन महिला व दोन पुरुष डॉक्‍टर आहेत तर ग्रामीण रुग्णालयाकडे नेमणूक तीन डॉक्टरांची असून आज रोजी एकच डॉक्टर कार्यरत आहेत. तर अन्य तिघे जण काम शिराळ्यात करतात व पगार कोकरुड ग्रामीण रुग्णालयात घेत आहेत. येथे .नेमणुकीस डाॅक्टरच नसल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीत आरोग्य सेवा सुरु कुणी करायची असा सवाल उपस्थित होत  आहे.

     विधान परिषदेचे माजी सभापती कै.शिवाजीराव देशमुख यांच्या प्रयत्नातून कोकरुड  येथील माळरानावर नूतन ग्रामीण  रुग्णालयांच्या इमारतीला निधी मिळाला व  काही महिन्यातच इमारतीचे बांधकाम ही पुर्ण होवुन सुसज्ज अशी वास्तु उभारली असुन या इमारतीच्या उद्घाटनाचा प्रश्न अनुतरीत असल्याने इमारत वापराविना धुळ  खात होती.
सध्य परस्थिती कोरोना रुग्णांची व संशयीतांची व्यवस्था व्हावी म्हणुन
 जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून ही वास्तू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ताब्यात घेतले असून आमदार नाईक यांच्या आदेशावरून १ मे रोजी या वास्तूत ओपीडी सुरू करण्यात येणार होती मात्र आरोग्य विभागाने डोळे झाकपणाच  केल्याचे समोर आले असून या ठिकाणी डॉक्टर नेमणुकीस नसल्याने उपस्थित कर्मचारी यांच्यावर आणि प्रसंगाने भागातील आस लावुन बसलेल्या जनतेला ही बाब  विचार करण्यास भाग पाडत  आहे.
 सध्या सुरु असलेल्या  जुन्या इमारतीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आराम मिळत असून तीन दिवस ऐकाने कर्तव्यावर व उरलेले  तीन दिवस दुसऱ्याने  कर्तव्यावर असा नित्यनियम पाहण्यात येत आहे. त्यामुळे नूतन इमारत तिकडे व आमदारांच्या आदेशाकडे सोयीस्कर  दुर्लक्ष करण्यात येत आहे.

 फोटो :-  कोकरूड तालुका शिराळा येथील नूतन ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज नविन इमारत .(छायाचित्र आनंदा सुतार खुजगांव.)

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .