कोडोली ग्रामपंचायती मार्फत कोरोनाशी लढण्यासाठी आधुनिक वैद्यकीय किटचे वितरण.
कार्वे प्रतिनिधी :-
कोडोली ता. कराड येथील आरोग्य केंद्रातील आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचे पथक रोज घरोघरी सर्वे करत आहे.या पथकाकडून सर्दी ,ताप, खोकलासह सारीच्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे. यांना ग्रामपंचायत कोडोली विविध सुविधा पुरवत असून नुकतेच डिजिटल थर्मामीटर, पीपीई किट आधी सामग्री देण्यात आली आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्राचे काम आणखी अचूक व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे.
कराड लगतच्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे कोडोली गावात रोज घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्याचे काम कोडोली आरोग्य केंद्रामार्फत केले जात आहे .या मध्ये आशासेविका,अंगणवाडी सेविका, आरोग्य केंद्रांचे मॅडम असे एकूण बारा सेविका यासाठी काम करत आहेत .त्यात वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत .हे कर्मचारी घरोघरी भेटी देऊन रुग्णांची माहिती घेत आहेत.
यासाठी कोडोली ता.कराड येथील ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाच्या संसर्गजन्य वातावरणात आरोग्यकर्मी गावात काम करत आहे. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी व सुरक्षेची काळजी घेण्यासाठी आणि त्यानुसार रुग्णांचा अंगाला हात न लावता मोजता येणारी दोन डिजिटल थर्मामीटर याचा उपयोग आरोग्य सर्व्हे करणारे पथकाला होणार आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजणारे दोन ऑक्सीमीटर ही ग्रामपंचायतींनी खरेदी केली आहेत. ऑक्सीमीटर च्या आधारे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण लगेच कळणार असून हे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या रुग्णावर अधिक लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.सर्वे करताना तापाचे रुग्ण आहेत का, याची माहिती विचारण्यात येत होती.आता थेट थर्मामीटरच्या सहाय्याने तातडीने दाखवणे शक्य होणार आहे.तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णाला हात न लावता त्याचा ताप मोजता येणार आहे.
त्याचबरोबर सॅनिटायझर,हॅन्डवॉश, मास्क, फेसशील्ड आधी सामुग्री ही पुरवण्यात आली आहे.या सर्व सामग्रीद्वारे कर्मचाऱ्यांना कोरोना पासून स्वतःचा बचाव करणे शक्य होणार आहे. हे सर्व साहित्य ग्रामपंचायती मार्फत देण्यात आले आहे.
यावेळी वडगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर जाधव कोडोली गावचे डॉ. विजय जगताप व डॉ. जगदीश जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळेस सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, दक्षता कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ इत्यादी सोशलडिस्टन्सचे नियम पाळून उपस्थित होते.

Comments
Post a Comment