किनरेवाडी येथे विद्युत वाहीनीचा शाॅॅक लागून काम करणारा मिस्त्री जखमी.
उपचारासाठी चरण येथे खासगी दवाखान्यात दाखल.
शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार )
किनरेवाडी ता.शिराळा येथे नविन घराचे बांधकाम सुरु असुन मिस्त्री राजू दगडू सुतार वय २६ रा.चरण यास ११ केव्ही विद्युत वाहिनीचा शॉक लागून तो जखमी झाला असून त्याला चरण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
किनरेवाडी येथील बाबासो बापू किनरे यांच्या नवीन घराचे काम सुरु आहे काम अंतिम टप्यात असुन अवकाळी आलेल्या पावसामुळे घरावरील पत्रे बसवायचे काम शिल्लक होते.शनिवारी पावसाने थोडी उघडीप दिल्याने सकाळी पत्रे बसवण्याच्या कामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. नविन बांधकाम सुरु असलेल्या घरावरूनच महावितरणची विद्युत वाहिनी गेली असून, या वाहिनीच्या खाली चार ते पाच फूट अंतरावर घरावर बसलेले मिस्त्री यांचा विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श त्यांना झाला आणि ते काही सेकंद तिथेच अडकून राहिले या वेळी प्रसंग अवधान राखून घराचे मालक बाबासो किनरे यांनी त्यांना लाकडी चिव्याने बाजूस केले त्यावेळी सुतार पत्र्यावर पडले हा पत्रा सिमेंटचा असल्याने, पत्रा फुटून ते खाली दहा ते बारा फुटावर पडले. तातडीने त्यांना बेशुद्ध अवस्थेत चरण येथील यशवंत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असुन सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असुन घटनेची माहिती मिळताच महावितरण पणुब्रे शाखा अभियंता अमोल भेडसगांवकर यांनी घटनास्थळी भेट देवुन माहीती घेतली .

Comments
Post a Comment