कोडोलीतील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलला.
श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित उपलब्ध करून देण्यात आला.
कार्वे प्रतिनिधी :-
कोडोली ता. कराड येथील वाकान नावाच्या शिवारातील ट्रांसफार्मर नादुरूस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रचंड उन्हामुळे सध्या शेतीच्या पाण्याचा उपसा करताना डीपी वरील तान वाढून वीज पंप जळत आहेत. तसेच ट्रान्सफॉर्मर वर लोड येत असल्यामुळे त्यामध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यातच मान्सूनपूर्व हंगाम चालू झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. भात पेरणी ,सोयाबीन, भुईमूग टोकणी , ऊस लागणी व शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. अशातच डीपी बिघडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. डीपी नादुरुस्त असल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
विद्युत ट्रान्सफॉर्मर सतत बिघडत असल्याचे अडचण कोडोलीतील स्थानिक शेतकऱ्यानी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे फोनद्वारे संपर्क साधून मांडले होती.याची दखल घेऊन खा. श्रीनिवास पाटील यांनी कोडोलीतील वाकान नावाच्या शिवारातील नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित उपलब्ध करून दिला.
वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे चालू झाल्याबद्दल कोडोली येथील शेतकऱ्यांनी साहेबांचे आभार मानले.


Comments
Post a Comment