ग्रामिण भागातील यात्रा रद्द झाल्याने छोट्या मोठ्या व्यापार्याच्या उलाढालीला लागला ब्रेक.
आर्थिक गणित कोलमडले, होलसेल व्यापारी पैशासाठी तगादा लावु लागलेत.
संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे त्यातच राज्य सरकारने राज्यात कोरोनाच्या पार्शवभूमीवर यात्रा-जत्रा, सण, उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला यात्रा हंगाम सुरु होण्याच्या काळातच मागील दोन महीन्यापासून ग्रामीण भागात सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे कंबरडे अक्षरशा मोडले आहे किरकोळ व्यवसाय करणार्यांन समोर सध्या जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला असून, जवळपास प्रत्येक व्यापार्याची उलाढाल कोरोनाच्या महामारीने यात्रा ऐन वेळी रद्द केल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. शिराळा तालुक्यातील व बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या या निर्णयामुळे मोठा हादरा बसला असून, जवळपास सर्वच व्यावसायीक अडचणीत सापडले आहेत. बराचसा व्यापारी वर्ग हा शेती नसनारा मजुर वर्ग आहे यात्रा सपंल्या की मिळेल तो रोजगार करुन कुंटुबाचा गाडा हाकणारा आहे. अनेकांच्या घरी दोन वेळचे अन्न खायला नसल्याने या लाॅकडाऊनच्या परस्थितीत प्रशासनाकडुन मदतीची अपेक्षा धरुन आहेत.
यात्रेत खेळणी,चप्पल, कटलरी,फुगे, अशा अनेक वस्तूंची दुकाने यात्रेत मांडुन दिवस रात्र व्यवसाय करतात.
यात्रेत व्यवसाय करण्यासाठी शिराळा तालुक्यातील पन्नास भर छोटे मोठे व्यापारी आहेत यात्रांचा सिझन सुरु होण्या आगोदरच व्यापारी मालाची तयारी करतात कराड ,कोल्हापुर, मुबंई या मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांन कडुन उसनवार करुन माल यांनी भरून ठेवला आहे. यात्रेचा सिझन संपला की जेवढा माल विकला जातो त्या हिशोबाने उसनवार भागवतात .दरवर्षी प्रमाणे माल भरल्याने यंदा मात्र ही मंडळी भलतीच अडचणीत आली आहेत . शहरातील व्यापारी मात्र पैशासाठी मागणी करत आहे उलाढालीला ब्रेक लागला असल्याने यांच्या पुढे मोठा प्रसंग उभा राहीला आहे , स्वतांचे घर संभाळायचे की वर्षभर सभाळणारा व्यापारी ?
मालासाठी उधारीत व स्वंताचे असणारे भांडवल लावल्याने रक्कम गुंतली आहे.यात्रा रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतून पडला आहे. पुढील काही वर्षे याचा परिणाम व्यवसायावर होण्याची भीती व्यापारी संभाजी काबंळे यांनी व्यक्त केली असून, इतर सर्व व्यापाऱ्यांची हीअशीच परिस्थिती असल्याचे ही सांगितले. तरी शासनाने याची दखल घेवुन यात्रा करणार्या व्यापार्यांना मदत करावी असे निवेदन व्यापारी संघटनेच्या वतीने शिराळा तहसिलदार यांना दिले आहे.या वेळी पोपट बनसोडे, संभाजी काबळे,शंकर बागडे, तानाजी काबंळे,गंगाराम थोरात , भगवान इंगळे,लक्ष्मी दरगडे,संगिता शिंदे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment