संकट काळात सचिन पाटील यांचा माणुसकीचा हात.
"सचिन पाटील मित्र परिवाराकडून कार्वे नाका व गोळेश्वर परिसरातील १२५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे किट घरपोच वाटप केले"
कार्वे - प्रतिनिधी .
सध्या कराड तालुका मध्ये कोरोणा विषाणुच्या संसर्गजन्य रोगामुळे कराड व मलकापूर सह परिसरातील अकरा गावा वरती मोठे संकट कोसळले आहे सबंध तालुक्यातील लोक आपल्या जीवाची काळजी घेत प्रचंड दहशतीखाली आहेत सध्या कराड मलकापुरसह ११गावांमध्ये पूर्णपणे शंभर टक्के लाकडाऊन असल्यामुळे अशा परिस्थितीत कार्वे नाका येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील व त्यांच्या मित्रपरिवार विविध समाजातील निराधार गरीब व गरजू लोकांना आधाराचा हात देण्याचे काम सचिन पाटील यांच्या मदतीने करत आहेत सध्या कराड मलकापूरसह ११ गावांमध्ये १०० टक्के लाकडाऊन असल्यामुळे कार्वे नाका व गोळेश्वर परिसरात असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा घरामध्ये कमतरता भासत असताना सचिन पाटील यांच्या माध्यमातून कार्वे नाका व गोळेश्वर परिसरातील सुमारे 125 कुटुंबांना पाच किलो आटा तीन किलो तांदूळ दोन किलो बटाटा दोन किलो कांदा एक किलो तेल एक किलो साखर चहा पावडर तुरडाळ डेटॉल साबण सनीटायझर बॉटल अशा प्रकारचे जीवनावश्यक वस्तू किट तयार करून गरीब व गरजूंना ही मदत स्वखर्चाने घरपोच करण्याचे कार्य सुरू केले आहे.येथे काही दिवसात नागरिकांना मोफत व घरपोच भाजीपाला वाटप करण्याची माहिती सचिन पाटील यांनी दिली.सचिन पाटील यांच्या समाजसेवी कार्याबद्दल नागरिकांतून कौतुक होत आहे.यावेळी सचिन पाटील बंटी जाधव, थोरात वैभव, जाधव विकास, जाधव विद्याधर, यादव अजित, घोरपडे राजू, व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment