शिराळा तालुक्यात खिरवडे येथील वृध्दास कोरोनाची लागण.
सदर व्यक्ती मुबंई येथुन कुंटुबासह गावी आली होती.
शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार)
मुंबईहून खिरवडे तालुका शिराळा येथे आपल्या मूळ गावी कुंटुबासह आलेल्या एका चाकरमान्यास कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला आरोग्य विभागाने शनिवारी दि. २३ मे रोजी मिरज येथील कोवीड रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असल्याची माहिती कोकरुड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. घुले यांनी दिली.
डॉ. घुले म्हणाले संशयित रुग्ण दि.२० मे रोजी मुंबईहून आपल्या सख्ख्या चुलत भावाच्या कुटुंबासहआले होते. तसेच त्यांच्या सोबत शिरसटवाडी येथील एक नातेवाईक ही सोबत आला होता. हे कुंटुब शेडगेवाडी येथे एक दिवस मुक्कामी होते त्यानंतर त्यांना खिरवडे येथे गृहअलगीकरन केले होते त्यांची दररोज आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत होती त्याला मागील चार दिवसांपासून सर्दी ताप येत होता यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेत याच्यावर उपचार चालू केले दरम्यान शनिवारी २३ रोजी सकाळी त्यास पुन्हा ताप आल्याने तसेच कोरोनाची संभाव्य लक्षणे दिसू लागल्यामुळे आरोग्य विभाग ने त्यास पुढील उपचारासाठी मिरज येथील कोविड रुग्णालयात पाठवले व त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता.रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असुन त्यांच्या संपर्कात असलेला चुलत भाव, पत्नी, मुलगी व शिरसटवाडी येथील एक नातेवाईक यांना रात्री आरोग्य विभागाने शिराळा येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वसतीगृहात संस्थात्मक अलगीकरण केले असुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली . मोहरे नंतर खिरवडे येथे कोरोनाची लागन झाल्याने पश्चिम भागात लोकांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
शिराळा तालुक्यात मुंबईहून येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंनदिवस वाढत असून तालुक्यात रुग्णांची संख्या ही वाढू लागले आहे सांगली जिल्ह्यात ८२ रुग्ण कोरोना बाधित असून यामध्ये आज नवीन चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
मोहरे ता.शिराळा येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील १४ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने मिरज येथे तपासणी पाठवण्यात आले होते त्यापैकी १३जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.मोहरे येथील वृध्दाच्या मोठ्या भावाचा अहवाल ही पाॅझिटिव्ह आला आहे त्यामुळे मोहरे येथे रुग्ण संख्या दोन झाली आहे. सध्या तालुक्यात कोरोनाची लागण होवुन उपचार सुरु असणार्यांची संख्या आठ झाली आहे.
गावात पथकाच्या माध्यमातून घरो घरी जाऊन सर्वे सुरू आहे .प्रशासनाने गावातील प्रमुख रस्ते बंद करुन संपुर्ण गाव सिल केले आहे. तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, तलाठी मारुती सातपुते यांनी येथे भेट देवुन गावात पहाणी करुन कोणीही घरा बाहेर न पडण्याचे अवाहन केले आहे.


Comments
Post a Comment