शिराळा तालुक्यात मोहरे येथील एकजण कोरोना पाॅझीटीव्ह.
शिराळा- प्रतिनिधी (आनंदा सुतार )
शिराळा तालुक्यातील मोहरे येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे .मोहरे येथे मुंबई (विक्रोळी )हून दि. १६ मे ला हे कुंटुब गावात आले होते त्यातील ५० वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाली असुन या कुटुंबातील १२ लोकांना गावातच घरी होम क्वारंटाईन केले होते. चार दिवसा पुर्वी त्यांच्यातील एक जण शेडगेवाडी येथील खाजगी दवाखन्यात ताप आला असल्याचे सांगुन औषध मागण्यासाठी आला होता पण डाॅक्टरांनी औषधे न देता सरकारी दवाखन्यात जाण्याचा सल्ला दिला व त्यांपैकी एकाला जास्त त्रास होऊ लागल्याने चरण येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात जावुन तपासणी केली असता ताप व खोकला असल्याचे व कोरोना रोगाची प्राथमीक लक्षणे आढळल्याने त्यांना मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्यांचा कोरोना चाचणी अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. शिराळा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. मोहरे येथील त्या वृद्धाच्या संपर्कात असलेल्या बारा जणांना शिराळा येथे आयटीआय येथे संस्थात्मक अलगीकरण रात्री करण्यात आले असुन गावातील आणखी एका व्यक्तीस अलगीकरण कक्षात दाखल केले आहे.कारण ही व्यक्ती या कुंटुबाच्या संपर्कात आली होती. जर या व्यक्तीचा ही अहवाल पाॅझटीव्ह आला तर मात्र चरण व शेडगेवाडी व्यापार पेठ तसेच आजु बाजुच्या गावांन सह संपुर्ण परीसर लाॅकडाऊन करावा लागेल कारण मोहरे गावातील ती व्यक्ती चरण व शेडगेवाडी बाजार पेठेत बर्याच वेळा फिरुन गेली आहे. सध्या मोहरे गांव तीन दिवसान साठी बंद करण्यात आले असुन ब्लोअर च्या साह्याने संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारणी करून संपूर्ण गाव निर्जंतुक करून घेतलेआहे.

Comments
Post a Comment