गोतावळा मोठा मात्र अंतिम क्षणी ना कोणी कारण "कोरोना".
मोहरे येथे अंत्यसंस्कार शिराळा तालुक्यातील कोरोना बाधित पहिल्या रुग्णाचा बळी!शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार)
गोतावळा मोठा मात्र अंतिम क्षणी ना कोणी कारण "कोरोना" संपुर्ण कुंटुब शिराळा येथे अलगिकरण केले आहे. घरी आपले म्हणारे कोनी नव्हते, मोहरे ता. शिराळा येथील कोरोना बाधित रुग्णावर शासनाच्या नियमा नुसार मोहरे येथे त्यांच्या मूळगावी वारणा नदी काठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित व्यक्ती मुंबई येथे वास्तव्यास होती.हे कुटुंब मुंबईहून१५ मे रोजी मोहरे येथे आले होते.त्यांना गावातच होम क्वारंटाईन केले होते . मयत पन्नास वर्षीय वृध्दास बुधवारी त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कातील १४ जणांना शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वस्तीगृहात संस्थात्मक अलगीकरण केले होते. पश्चिम भागातील मोहरे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दगावल्याने , तो तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला असून यामुळे पश्चिम भागाची चिंता वाढली आहे. रुग्णाला मोहरे येथे दहन करण्यात आल्याने काही वेळ गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मोहरे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार सुरू असताना दगावला आणि गावामध्ये निरव शांतता पसरली.प्रशसकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी गावामध्ये येऊन मिटिंग घेऊन , दगावलेल्या व्यक्तीच्या पार्थिवाला दहन कोणत्या पद्धतीने करता येईल याची सविस्तर माहिती देऊन , लोकांच्यात प्रबोधन केले.त्यानंतर गावात नेमलेल्या स्वयंसेवकांनी व पोलिसांनी गावातील सर्वांनी घरांतच थांबण्याचे आवाहन करुन संपूर्ण गाव बंद केले.पीपीए किट धारण केलेल्या तिघांनी , वारणा नदी काठावर असलेल्या स्मशान शेडमध्ये रुग्णाला दहन केले.यावेळी तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस उपस्थित होते. तालुक्यातील पहिला बळी ठरल्याने संपूर्ण तालुक्यात भितीचे वातावरण असून एका पाठोपाठ एक रुग्ण पश्चिम भागात सापडू लागल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पश्चिम भागातील हजारो लोक मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत.यातील २५ टक्के लोक लॉकडाऊनसुरु होण्या आगोदर तर काहीजण लाॅकडाउन मध्ये ही आले आहेत तर अजून ७५ टक्के लोक गावी येण्यासाठी, वेगवेगळे मार्ग शोधत आहेत.परवानगी मिळेल तशे लोक आपल्या मुळ गावी येत आहेत. यातील बहुतेक लोक होम कॉरनटाईन आहेत तर यातीलच काही घरातील सदस्य या ना त्या कारणाने इतर गावात भटकत आहेत.
ग्रामपंचायतीकडून वारंवार उपाय योजना व घ्यावयाची काळजी या बाबत प्रबोधन करण्यात येत आहे मात्र त्याकडे लोक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.


Comments
Post a Comment