वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात येणार डॉ.अतुलबाबा भोसले" यांच्या प्रयत्नांना यश सर्वसामान्य शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण.
वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात येणार.
" डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश सर्वसामान्य शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण."
ब्युरो रिपोर्ट -गोंडवाना न्यूज.
गेल्या दोन महिन्यापासून वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात सोडण्याबाबत उंडाळे, काले विभागातील शेतकऱ्यांच्या मागणी नुसार व विविध ग्रामपंचायतीचे मागणी नुसार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्याकडे व संबंधित कार्यालयशी सातत्याने पत्रव्यवहार करून, वेळप्रसंगी अतुल बाबानी स्वतः फोन वरती अधिकाऱ्यांशी बोलून, पाणी सोडण्यासाठी लागणारे वीज बिला पोटी रक्कम भरण्यासाठी पैसे देण्याची हमी य.मो.कृष्णा कारखानाचे वतीने स्वतः घेतली.
परंतु तात्काळ पाणी दक्षिण माड नदीपात्रात सोडावे यासाठी अधिकाऱ्यांना विनंती करणारे कराड दक्षिणचे भाग्यविधाते सर्वांचे लाडके नेते मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या अथक प्रयत्नाने दक्षिणमांड नदीपात्रात आज दि 08/03/2024 रोजी पाणी सोडण्यात आले. गेले चार वर्षे सातत्याने जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्यामुळेच दक्षिणमांड नदीपात्रात उन्हाळ्यात पाणी दिसले.
चालू वर्षीही अनेकांनी मोकळ्या बैठका घेतल्या परंतु यातून काय निष्पन्न झाले नाही या योजनेचे थकीत वीजबिल भरण्याची हमी स्वतः बाबांनी घेऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पाणी सोडण्यास भाग पाडले ते फक्त मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांनीच गेल्या दोन महिन्यापासून संबंधित विभागाशी करत असलेल्या चर्चेतून काढलेल्या मार्गामुळे व य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वीज बिला पोटी लागणारी रक्कम भरण्याची हमी घेतल्या मुळेच उंडाळे व काले विभागातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पाणी मिळाले. त्याचबरोबर भविष्यात ही पाणी सोडत असताना वीज बिल भरण्याबाबत अथवा शासनाकडे पाठपुरावा करून हे वीज बिल भरायलाच लागू नये त्यासाठी लागणाऱ्या उपयोजना राज्याचे उपमख्यमंत्री तथा जलसंपदा मत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस (साहेब) यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार असे आश्र्वासित केले. त्यामुळे दक्षिणमांड नदी क्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांचे आभार मानले.

Very good
ReplyDelete