Posts

Showing posts from November, 2020

207 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 332 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.

Image
  207 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 332 जणांचे नमुने पाठविले तपासणीला. सातारा दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 207 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 332 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.   332  जणांचे नमुने पाठविले तपासणीला. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 17, कराड येथील 25, फलटण येथील 17, कोरेगांव येथील 9, वाई येथील 20, खंडाळा येथील 16, रायगांव येथील 8, पानमळेवाडी येथील 30, मायणी 8, महाबळेश्वर येथील 1, पाटण 3, दहिवडी येथील 17, खावली येथील 16, तळमावले 13, म्हसवड येथील 21, तरडगाव येथील 39 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 72 असे एकूण 332 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. एकूण नमुने -248107. एकूण बाधित -51147. घरी सोडण्यात आलेले -48587. मृत्यू -1718.  उपचारार्थ रुग्ण-842.

जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु.

Image
  जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु.  सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये          *सातारा तालुक्यातील*   सातारा 3, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, दिव्यनगरी 1, विकासनगर 2, शाहुपूरी 1, भाग्यलक्ष्मी कॉलनी 1, सदाशिव पेठ 1, कृष्णानगर 1, सैदापूर 2, काशिळ 1, एकंबे 1, वंदन 1, विसावानाका 2, कोंडवे 2, कोडोली 1, शाहुनगर 1, शिवथर 2, वाढेफाटा 1, पाडळी 1, धनवडवाडी 1,             *फलटण तालुक्यातील* शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, कोळकी 1, लक्ष्मीनगर 2, विद्यानगर 1, साखरवाडी 3, पिंपळवाडी 2,  वाघोशी 1, मिरेवाडी 1, खामगाव 3, सुरवडी 1, रेवडी 1, होळ 1, कुंटे 1,  फडतरवाडी 1, विढणी 3, हिंगणगाव 1, ढवळेवाडी 1,             *खटाव ताल...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून पत्रकार व कुटुंबियांना खाजगी रूग्णालयात मिळणार मोफत उपचार.

Image
  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून पत्रकार व कुटुंबियांना खाजगी रूग्णालयात मिळणार मोफत उपचार. कराड : कोविड १९ ने महाराष्ट्रासह देशभर हैदोस माजवल्याने गेल्या १० महिण्यापासून पत्रकारांपुढे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. महाराष्ट्रात आर्थिक अडचणीमुळे कोविड १९ या आजारांने अनेक पत्रकारांचा मृत्यू झाला आणि कुटुंब पोरके झाले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून संघाच्या लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना खाजगी रूग्णालयात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ असे एक वर्ष कोविड १९ वर उपचार, सांधे व मणक्याच्या आजारावरील उपचार, अॅक्सिडेंट व फ्रॅक्चर, संधीवात, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, सर्पदंश व विषबाधा, कॅन्सर,  एच.आय.व्ही., टी.बी., छातीचे विकारांचे निदान व उपचार, एक्सरे, इ.सी.जी., पॅरासिस, मुळव्याध, किडणीचे विकार व उपचार, महिलांचे विविध आजार, पोटाचे विकार, लहान मुलांचे सर्व विकार, सर्दी, ताप, खोकला, मलेरिया व किरकोळ आजार अशा सर्व आजारांवर  मोफत उपचार करून दिले जाणार असून काही आजारांवर सव...

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प - हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य व मशागतीसाठी अनुदान.

Image
  नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प.   प्रतिनिधि - प्रदीप पाटील. नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प - हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य व मशागतीसाठी अनुदान-                                                           अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -            (१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                                                               (2) २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                ...

88 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 26 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.

Image
  88 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 26 जणांचे नमुने पाठविले तपासणीला. सातारा दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 88 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 26 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.   26 जणांचे नमुने पाठविले तपासणीला. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 8  पिंपोडा  येथील 18असे एकूण 26 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. एकूण नमुने -247329* *एकूण बाधित -51059*   *घरी सोडण्यात आलेले -48380*   *मृत्यू -1713*   *उपचारार्थ रुग्ण-966*    

PM किसान योजना : 'या' तारखेपासून शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होईल 7 वा हप्ता, 'या' पध्दतीनं तपासा तुमचं यादीमधील नाव.

Image
 PM किसान योजना : या पध्दतीनं तपासा तुमचं यादीमधील नाव. प्रतिनिधि - प्रदिप पाटील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता 1 डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर होण्यास सुरुवात होणार आहे. मोदी सरकार या योजनेंतर्गत दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. गेल्या 23 महिन्यांत मोदी सरकारने 11.17 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 95 कोटींपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली आहे. आता सरकार या योजनेंतर्गत दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. या योजनेतील पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान जारी केला जातो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या अपडेट यादीमध्ये आपले नाव असल्यास ते तुम्हाला या योजनेंतर्गत लाभ मिळवून देतील. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना.

Image
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन  योजना.   प्रतिनिधि- प्रदिप पाटील, (गोंडवाना  न्यूज ) ऊद्देश- अनुसूचीत जाती/ नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी यांना देण्यात येणारे अनुदान- 1. नविन विहिर- रु.250000/- 2. जुनी विहिर दुरुस्ती- रु. 50000/- 3. इनवेल बोअरिंग- रु.20000/- 4. विज जोडणी आकार- रु.10000/- 5. शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरिकरण- रु.100000/- 6.सूक्ष्म सिंचन संच- ठिबक सिंचन- रु.50000/-, तुषार सिंचन- रु. 25000/- 7. पंप संच (डीझेल/विद्युत)- रु.20000/- (10 एचपी क्षमते पर्यंतच्या पंप करिता) मार्गदर्शक सुचना-  सदर योजने अंतर्गत वरिल 7 बाबींचा समावेश असुन लाभ पैकेज स्वरुपात देण्यात येइल. ज्या शेतकरी यांनी यापूर्वी नविन विहिर व जुनी विहिर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेतला असेल अशा लाभार्थ्यां व्यतिरीक्त इतर सर्व लाभार्थ्याना खालील 3 पैकी कोणत्याही एकाच पैकेज चा लाभ लाभार्थिस देय आहे. 2.1. नविन विहिर पैकेज- नविन विहिर, विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच व आवश्यक्तेनुसार इनवेल बोअरींग. 2.2 जुनी वि...

जिल्ह्यात 1 ते 31 डिसेंबर कालावधीत क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिम" लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा सहभाग घेऊन मोहिम प्रभावीपणे राबवावी." - पालकमंत्री बाळासाहेब पाटील.

Image
  जिल्ह्यात 1 ते 31 डिसेंबर कालावधीत क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिम " लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा सहभाग घेऊन मोहिम प्रभावीपणे राबवावी."                                 - पालकमंत्री बाळासाहेब पाटील   सातारा दि. 28 (जिमाका):  सामाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान राज्यामध्ये दि. 1 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.    सुचनेप्रमाणे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेत लोकप्रतिनधींसह व नागरिकांचा सहभाग घेऊन ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.   या विषयी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रुग्णांचे लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. रोगशास्त्रीय अभ्यासानुसार दोन्ही आजारांचे रुग्ण निदान व उपचारापासून वंचित ...

येवती येथील भैरवनाथ यात्रा रद्द.

Image
  येवती येथील भैरवनाथ यात्रा रद्द. येवती - प्रतिनिधि, (ज्ञानेश्वर शेवाळे )  येवती ता कराड येथील श्री भैरवनाथ देवाची सालाबादाप्रमाणे यंदा १ डिसेंबर मंगळवारी व २ डिसेंबर बुधवारी भरणारी यात्रा कोरोनो च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती येवती ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली. येवती चे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा यंदा दि १ व २ डिसेंबर रोजी आहे मात्र कोरोनो चा वाढता प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे त्यामुळे ही यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय पोलिसांनी व ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बैठकीत घेण्यात आला त्यामुळे यंदा यात्रेच्या दिवशी कुस्त्या तसेच मनोरंजनाचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत कोणीही मंदिराच्या परिसरात गर्दी करू नये कोरोनो चा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामस्थांनी सर्व खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक दिप ज्योती पाटील यांनी येवती येथील  १ व २ डिसेंबर रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली अ...

कृषी सहायक संदेश कोंडावले यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

Image
  कृषी सहायक संदेश कोंडावले यांना कोरोना योद्धा हा सन्मान. कराड - प्रतिनिधि, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोरोनो योद्धां हा सन्मान देवुन गौरविण्यात आले या मध्ये ऊंडाळे विभागात काम करणारे कृषी सहायक संदेश कोंडावले यांना उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते कोरोनो योद्धां हा सन्मान देवुन गौरविण्यात आले या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते.

शिष्यवृत्ती परीक्षेत वैष्णवी आबासो पाटील हिचे यश. तालुक्यात गुणवत्ता यादीत पंधरावा क्रमांक पटकावला.

Image
शिष्यवृत्ती परीक्षेत वैष्णवी आबासो पाटील हिचे यश. "तालुक्यात गुणवत्ता यादीत पंधरावा क्रमांक पटकावला. "   उंडाळे - प्रतिनिधि,                          शिष्यवृत्ती परीक्षेत येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी आबासो पाटील हिने तालुक्यात गुणवत्ता यादीत पंधरावा क्रमांक पटकावला. तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिला विभाग प्रमुख आर. बी. पाटील,जगन्नाथ माळी, शंकर आंबवडे,आर. जी. सुतार, विरभद्र खुरपे, व्ही. के भोसले, व्ही. एस. कुंभार, एस. व्ही. पाटील, राजेंद्र गोरे, धनंजय पवार. यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थिनीचा संस्थेचे संचालक अँड आनंदराव पाटील, प्राचार्य बी.पी मिरजकर हौसाई कन्या शाळेचे मुख्याध्यापक बी. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.               फोटो ओळी.. वैष्णवी पाटील हिचा सत्कार करताना अँड आनंदराव पाटील, प्राचार्य बी.पी मिरजकर, मुख्याध्यापक बी आर पाटील, आर. बी. पाटील, रामचंद्र पाटील, जगन्नाथ माळी....

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान.

Image
  रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान. ●रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद ●पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार सातारा  - प्रतिनिधी, कोरोनापासून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कार्य करणारे पोलीस दल. या पोलीस दलात दर महिना उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस बंधू भगिनींना "पोलिसमॅन ऑफ द मंथ" हा पुरस्कार देऊन पोलीस डिपार्टमेंट गौरव करते. त्याच पोलीस जवानांचा सन्मान रयतेचे स्वराज प्रतिष्ठानला करण्याची इच्छा आहे तरी त्यास परवानगी मागणारे  पत्र पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्षा- अश्विनी महांगडे यांनी दिले. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.यावेळी संतोष पवार, परवेझ लाड यांनी प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कामाची त्यांना माहिती दिली. पोलिसांमुळे कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सदकार्य केले ते पोलिसांनीच. आपण घरात सण साजरे करतो आणि पोलीस मात्र आपल्या रक्षणासाठी घराबाहेर असत...

स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात "डोळ्यांची निगा व दक्षता" या विषया वर ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्यान संपन्न .

Image
 स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  "डोळ्यांची निगा व दक्षता" या विषया वर ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्यान संपन्न . 'नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल फासे यांनी केल मार्गदर्शन.' उंडाळे - प्रतिनिधि,                                   दृष्टी चांगली राहिली पाहिजे यासाठी बालवयापासूनच डोळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कराडचे नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल फासे यांनी केले.    येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये *डोळ्यांची निगा व दक्षता* या विषया वर ऑनलाईन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी. पी. मिरजकर, जगन्नाथ माळी, शंकर आंबवडे, गणेश शेवाळे यांची उपस्थिती होती.                  यावेळी श्री फासे म्हणाले, सध्या लाँकडाऊनचा  कालावधी आहे. शाळा सुरू झाले आहेत नववी ते बारावी हे वर्ग सुरू झाले आहेत. पाचवी ते आठवी या वर्गांना ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑ...

हौसाई कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीनी दिली मास्कची अनोखी भेट.

Image
  हौसाई कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीनी दिली मास्कची अनोखी भेट. "  कु. रिंकू प्रजापत , उषा प्रजापत, पूजा प्रजापत या माजी विद्यार्थ्यांनी २०० मास्क विद्यार्थ्यांसाठी दिले ." कराड - प्रतिनिधि, मलकापूर ता. कराड येथील हौसाई कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीनी स्वतः मास्क शिवून  विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 200 मास्कची  अनोखी भेट दिली. विद्यार्थिनीच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.  याबाबत अधिक माहिती अशी मलकापुर ता. कराड येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या हौसाई कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी कु. रिंकू प्रजापत , उषा प्रजापत, पूजा प्रजापत या माजी विद्यार्थ्यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या आपल्या पूर्वीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सुमारे दोनशे मास्क स्वतः तयार केले. आणि शासनाच्या  निर्णयानुसार शाळा सुरू होणाऱ्या पहिल्या दिवशी हे मास्क शाळेकडे सुपुर्त केले.  विशेष म्हणजे या विद्यार्थिनी शाळेत पूर्वी शिकत असताना शिक्षक असणारे बी. आर. पाटील नुकतेच विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आहेत य...

स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे शिक्षक जगन्नाथ माळी यांच्या कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी.

Image
  स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे शिक्षक जगन्नाथ माळी यांच्या कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी. उंडाळे -  प्रतिनिधी ,      स्वतःचे दुःख बाजूला ठेवून कष्टकऱ्यांना दिवाळीचे फराळाचे वाटप करून येथील शिक्षक जगन्नाथ माळी कुटुंबीयांनी गोरगरीब कष्टकऱ्यांचे दिवाळी गोड केली आणि माळी कुटुंबाच्या अनोख्या दिवाळी भेटीचे परिसरात कौतुक होत  आहे. याबाबत अधिक माहिती अशी  या वर्षी दिवाळी सणावर कोरोना चे संकट होते. त्यामुळे कामधंदा, रोजगार नसल्याने गरीब कष्टकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे. अशातच  दिवाळी सण आल्याने आणि अनेक कुटुंबाची दैना उडाली. पर जिल्ह्य़ातील कारखान्याचे ऊसतोडणी कामगार अशा परिस्थितीत समाजकार्यात नेहमी पुढे असणाऱ्या जगन्नाथ माळी यांना अशा कुटुंबांना फराळाचे पदार्थ  भेट देऊन त्यांची दिवाळी गोड  करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे श्री माळी  यांचे वडिलांचे सात महिन्यापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळी साजरी  करणार नव्हते मात्र त्यांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून  गोरगरीब कष्टकरी कुटुंबांना करंजी, लाडू,...

श्री. विकास हणमंतराव शेवाळे यांची भाजपा कराड दक्षिण मंडल व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड .

Image
  श्री. विकास हणमंतराव शेवाळे यांची भाजपा कराड दक्षिण मंडल व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड . कराड -प्रतिनिधी,    कराड दक्षिण भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षपदी मलकापुर शास्त्रीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते श्री.विकास हणमंतराव शेवाळे यांची निवड करण्यात आली.  य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ.सुरेश भोसले यांच्या हस्ते निवडीचे पञ त्यांना देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंञी आमदार चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.अतुलबाबा भोसले,जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तालुकाध्यक्ष पै.धनंजय पाटील, कृष्णेचे  व्हा.चेअरमन जगदीशदादा जगताप,संचालक धोंडीराम जाधव,दयानंद पाटील, नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, यांची यावेळी उपस्थिती होती. शेवाळे यांनी  मलकापुर नगरपरिषद निवडणूकीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमीका निभावलेले होती,  यावेळी त्यांनी व्यापारी वर्गाचा अडचणी सोडवू तसेच पक्ष बळकटी साठी तत्पर राहून, येणारा काळात पक्षाला अधिक मजबूत करणेची ग्वाही दिली,  निवडीबध्दल  त्यांचे नगरसेवक ...

तानाजी देशमुख यांची भाजपा कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड.

Image
  तानाजी देशमुख यांची भाजपा कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड.  कराड - प्रतिनिधी,    कराड दक्षिण भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी मलकापुर येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांची निवड करण्यात आली.  य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ.सुरेश भोसले यांच्या हस्ते निवडीचे पञ त्यांना देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंञी आमदार चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.अतुलबाबा भोसले,जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तालुकाध्यक्ष पै.धनंजय पाटील, कृष्णेचे  व्हा.चेअरमन जगदीशदादा जगताप,संचालक धोंडीराम जाधव,दयानंद पाटील,पै आनंदराव मोहिते, नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, यांची यावेळी उपस्थिती होती. देशमुख यांनी यापुर्वी मलकापुर शहर अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय असे कार्य केले असुन. मलकापुर नगरपरिषद निवडणूक विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमीका निभावलेले होती.पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते अग्रभागी राहिलेले आहेत. त्यांच्या निवडीने संघटनेमध्ये नवचैतन्य आले असुन आगामी काळामध्ये पक्षाला यश मिळवून देण्यामध्ये ते महत्वपू...

" संविधान दिवस " समारोह कार्यक्रमाचे आयोजन. 'युवा नेते नानासाहेब कांबळे व युवा नेते उत्तम कांबळे याच्या नेतृत्वाखाली सोनावडे येथे '.

Image
" संविधान दिवस " समारोह कार्यक्रमाचे आयोजन. 'युवा नेते नानासाहेब कांबळे व युवा नेते उत्तम कांबळे याच्या नेतृत्वाखाली सोनावडे येथे ' शिराळा - प्रतिनिधी, २६  नोव्हेंबर  'संविधान दिन' सर्वत्र उत्साहात साजरा होत असतो याच पाश्र्वभूमीवर  संविधान दिन समारोह  २६ नोव्हेंबर सकाळी ११.३० वाजता  सोनवडे (शिराळा तालुका) येथे आयोजन करण्यात आले आहे .युवा नेते नानासाहेब कांबळे व युवा नेते उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या संविधान दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे . या साठी प्रमुख पाहुणे म्हणून   प्रमुख पाहुणे.   तथागत युंवा ग्रुप महाराष्ट्र राज्य  निता आनंद बनसोडे. महाराष्ट्र सचिव महिला आघाडी  सौ.मंगल नांगरे प.महाराष्ट्र अध्यक्ष. ज्योतिताई अवघडे -सांगली जिल्हा अध्यक्ष,अनिकेत पवार वाळवा तालुका अध्यक्ष तुषार शिंदे सांगली जिल्हा अध्यक्ष.तसेच संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संदिप कांबळे मा.बाळासाहेब कांबळे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संविधान प्रतिष्ठान संघटना ,मा.ज्ञानदेव कांबळे. सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पोपट बनसोडे. जनसंपर्क प्रमुख . प्र...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपाघात विमा योजना..

Image
  "  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपाघात विमा योजना." शेती व्‍यवसाय करताना होणरे अपघात, विज पडणे, पूर,सपदंश, विचूदुंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्‍त्‍यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच,अन्य कोणत्‍याही कारणा मुळे होणारे अपघात, यामळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्‍यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्‍व येते.घरातील कर्त्‍या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटंबाचे उत्‍पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते.अशा अपघातग्रस्‍त शेतकऱ्यांस/त्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” कार्यान्वित केली आहे. सदर योजना अतंर्गत रु.2.00लाख इतक्‍या विमा संरक्षण देण्यात येते.    लाभार्थ्‍याचे पाञता निेकष शेतकरी म्‍हणून म‍हसूल कागदपञे ७/१२, ६ क, ६ ड (फेरफार) यामध्‍ये नोंदणीकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी.    विमा संरक्षणासाठी सामाविष्‍ट असलेले अपघात रस्‍ता/रेल्‍वे अपघात बुडून मृत्‍यु विष बाधा विजेचा धक्‍का विज पडणे नक्षलवादी हल्‍ला उंचावरून पडणे सर्पदंश प्राणीदंश खुन जनावराचा हल्‍ला दंगल जंतूंनाशके हाताळत...

कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीची मतदान केंद्राची तयारी ; सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा - जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी शेखर सिंह.

Image
  कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीची मतदान केंद्राची तयारी ; सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा              - जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी शेखर सिंह. सातारा दि.24 (जिमाका): शिक्षक व पदवीधर निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खरबदारी घेण्यात आली असून मतदारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात  शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे उपस्थित होत्या. सातारा जिल्ह्यात शिक्षक मतदार 7 हजार 711 तर पदविधर 59 हजार 71 मतदार आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्ण...

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणूक 2020 निवडणुक निरीक्षक निलिमा केरकट्टा यांनी घेतला साताऱ्यात आढावा, मतदान केंद्राची केली पाहणी.

Image
  पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणूक 2020  निवडणुक निरीक्षक निलिमा केरकट्टा यांनी घेतला साताऱ्यात आढावा, मतदान केंद्राची केली पाहणी. सातारा दि.22 (जिमाका): शिक्षक व पदवीधर निवडणूक शांततेत व पादर्शक पार पाडण्यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी  प्रयत्न करावेत, अशा सूचना निवडणूक निरीक्षक निलीमा केरकट्टा यांनी आज केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज शिक्षक व पदवीधर निवडूक  तयारीचा आढावा  निवडणूक निरीक्षक निलीमा केरकट्टा यांनी आज घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर आदी उपस्थित होते. शिक्षक व पदवीधर मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा सूचना करुन श्रीमती केरकट्टा पुढे म्हणाल्या मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. आदर्श आचार संहितेचा कुठेही भंग होणार नाही याची दक्...

कोरोनान सारा देश थांबवलाय, उंडाळे , ओंड परीसर अवैध दारू विक्रीन झिंगवलाय.

Image
  कोरोनान सारा देश थांबवलाय,  उंडाळे , ओंड परीसर अवैध दारू विक्रीन झिंगवलाय. " कोरोनाच्या संभाव्य उद्रेकास साजेशी परस्थिती, सुजान नागरिकांच्यात  भितीचं वातावरण" 'जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्याची नागरिकांच्यातून होत आहे  मागणी .' उंडाळे -प्रतिनिधी ( प्रदीप पाटील) ओंड व उंडाळे परिसरातील ग्रामीण भागात लॉकडाऊननंतर काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय  पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या गोरखधंद्याकडे प्रशासनाचे  हेतूपुरस्पर  दुर्लक्ष करतात असे नागरिकांकडून बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते की लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊन मध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना अटी व शर्तीच्या अधीन राहून दारूविक्रीला रीतसर परवानगी दिली. सध्या सरकार मान्य देशी दारू दुकानांतून पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू असून ही विक्री  सुरू असल्याचे दिसते.   तसेच ओंड व उंडाळे परिसरात येणाऱ्या ढाब्यावर व ओंड बसस्थानक परिसरात राजरोजपणे अवैध दारु...

कोडोली येथील जि.प .प्राथ. शाळेचा शिष्यवृत्ती चा निकाल ७३.०७ टक्के.

Image
  कोडोली येथील जि.प .प्राथ. शाळेचा शिष्यवृत्ती चा निकाल ७३.०७  टक्के. कार्वे - प्रतिनिधि,                      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या उच्च पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेत आय. एस. ओ. मानांकन प्राप्त जि. प. प्राथमिक शाळा कोडोली ता.कराड येथील कु.आदेश तातोबा जाधव या विद्यार्थ्याने 288 पैकी 230 गुण संपादन केल्याने शिष्यवृत्ती पात्र ठरला आहे. तसेच 200 पैकी अधिक गुण मिळालेल्या मध्ये श्रेयस गुरव 210 गुण, आदिती पाटील 206 गुण, श्रावणी जगताप 204 गुण, राज जगताप 202 गुण, तनुजा मोरे 200 गुण इत्यादी आहेत. तसेच अक्षदा माने,अक्षरा घाडगे,आरती जगताप, जान्हवी तांबेवाघ, कार्तिक शिंदे, पूजा जगताप, समृद्धी लोकरे, सानवी जगताप, संग्राम कोळी, शिवराज रायते, श्रीकांत मदने, शुभांगी मोरे, वरदराज जगताप इत्यादी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.विनायक निकम श्री. महेशकुमार बोंगाळे  श्री. विजय पाटील सौ. छाया कुंभार सौ. स्वाती गायकवाड ...

रमाई आवास घरकुल योजनेचा निधी त्वरित दयावा :रवी कांबळे.

Image
  रमाई  आवास घरकुल योजनेचा निधी त्वरित दयावा :रवी कांबळे. कराड - प्रतिनिधि, कोरणासारख्या  महामारी रोगामुळे, गेल्या काही महिन्यापासून लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे.या बेरोजगारीमुळे राज्यातील  दुष्काळी असलेल्या सर्वसामान्य लोकांवर,गेले काही दिवसांपासून आर्थिक संकट उभे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने रमाई आवास योजनेचा थकीत निधी लाभार्थी लोकांना त्वरित द्यावा, अशी मागणी,मं.कोळे गावचे, राष्ट्रीय सर्व श्रमिक  युनियन (प. महाराष्ट्र )सरचिटणीस रवी कांबळे यांनी, नामदार हसनजी मुश्रीफ (ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांना निवेदनाद्वारे केली आहे.अशातच रमाई आवास योजनांचे सन, 2018, -2019, -2020 मधील मंजूर लाभार्थी पैकी, काही घरकुल कामे चालू मध्ये बंद पडली आहेत, काही उसनवारी करून पूर्णत्वास नेहली आहेत. परंतु गेले अनेक दिवस शासन दरबारी घरकुलांचे अनुदान न मिळाल्यामुळे सर्व सामान्य घरकुल लाभार्थी यांचे संपूर्ण आर्थिक गणित ढासळले असून लाभार्थी चिंतेत पडला आहे.घरापासून लाभार्थी वंचित राहिला आहे. यावेळी निवेदन करताना, रवी कांबळे सरचिटणीस  (राष्ट्रीय ...

निवडणुक निरीक्षक निलिमा केरकेटा यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा.

Image
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ,निवडणुक निरीक्षक निलिमा केरकेटा यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा. कराड दि. 22 (प्रतिनिधी) पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक निरीक्षक निलिमा केरकेटा यांनी कराड येथिल छ. शिवाजी विद्यालय व विठामाता विद्यालयातील मतदान केंद्रांची पहाणी केली.यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी मतदान केंद्राची, मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली , याप्रसंगी पोलिस निरिक्षक बी आर पाटील, तलाटी संजय जंगम,महसूल कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक व पदवीधर निवडणूक शांततेत व पादर्शक पार पाडण्यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी  प्रयत्न करावेत, अशा सूचना निवडणूक निरीक्षक निलीमा केरकेटा यांनी आज केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज शिक्षक व पदवीधर निवडूक  तयारीचा आढावा  निवडणूक निरीक्षक निलीमा केरकेटा यांनी आज घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्ष...

पत्रकार हरीष पाटणे यांना डाॅ. संदीप डाकवे यांचेकडून 6000 वे स्केच भेट.

Image
  पत्रकार हरीष पाटणे यांना डाॅ. संदीप डाकवे यांचेकडून 6000 वे स्केच भेट. तळमावले/वार्ताहर शालेय वयापासून चित्रकलेचा छंद जोपासलेल्या अष्टपैलू चित्रकार, पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी आजपर्यंत अनेक दिग्गज व्यक्तिांना त्यांची व्यक्तिचित्रे, शब्दचित्रे, अक्षरचित्रे, अक्षरगणेशा चित्रे भेट दिली आहेत. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै.पुढारीचे वृत्तसंपादक हरीष पाटणे यांना त्यांनी दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर नुकतेच त्यांचे रेखाचित्र दिले. त्यांनी भेट दिलेले हे 6000 वे रेखाचित्र आहे. एका पत्रकाराकडून दुसÚया पत्रकाराला दिलेली ही आगळीवेगळी भेट आहे असेच मानावे लागेल. चित्रकलेचा छंद जोपासत डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून गरजूंना लाखो रुपयांची मदत करत सामाजिक बांधिलकीही जपली आहे. अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांना डाॅ.डाकवे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या मोहात पाडले आहे. सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडे डाॅ.संदीप यांची कला पोहोचली आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या कलेचे तोंड भरुन कौतुक केले आहे. अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ...

कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी ; नागरिकांनी सूचनाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह

Image
  कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी ; नागरिकांनी सूचनाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह. सातारा दि.20  कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे तज्ञ सांगत आहेत. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यात धडक मोहिम पोलीस, नगर परिषद आणि विविध विभागांमार्फत राबविण्यात येणार आहेत. मोहिमेंतर्गत जे नागरिक, दुकानदार शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे. काही दुकानांमध्ये आजही गर्दी दिसत असून सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाहीत अशी दुकाने 7 दिवस बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. दुकानदारांनी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच मास्क असल्यासच ग्राहकांना दुकानात प्रवेश देण्यात यावा तसेच दुकानात सुरक्षित अंतराचे पालन होईल याची देखील खबरदारी घ्यावी. कोरोना बाधिताच्या संसर्गात आलेले नागरिक टेस्टींग करण्यास विरोध करत आहेत खरबदारीचे उपाय म्हणून आरोग्य विभागाची टीम टेस्टींगसाठी आल्यास त्यांना विरोध करु नये संसर्ग पसर...

भागूबाई शेवाळे यांनी वयाच्या १०२ वर्षी घेतला जगात निरोप.

Image
  भागूबाई शेवाळे यांनी वयाच्या १०२ वर्षी घेतला जगात निरोप. उंडाळे - प्रतिनिधि,  येवती ता कराड येथील श्रीमती भागूबाई विष्णु शेवाळे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात १ मुलगी ५ पुतणे, सुना नातवंडे असा परिवार आहे त्या शिवतेज सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक तुकाराम शेवाळे व भैरवनाथ दूध संस्थेचे माजी चेअरमन दादासाहेब शेवाळे यांच्या चुलती होत्या. भागूबाई शेवाळे यांनी गेल्या ७० वर्षांपासून आपला संसार एकट्याने उभा केला त्यांच्या पतीचे निधन १९५० साली झाले होते तेव्हापासून आजपर्यंत भागूबाई यांनी परिस्थितीला न डगमगता आदर्श असा संसार करून सद्या च्या या आधुनिक पिढीला दाखवून दिले कि एकटी महिला काय करू शकते अशा या जेष्ठ आणि कर्तुत्ववान महिलेस भावपूर्ण श्रद्धांजली.

आरळा येथे विजेच्या तारेचा शॉक लागुन गवंडी कामगाराचा मृत्यु.

Image
  आरळा येथे विजेच्या तारेचा शॉक लागुन गवंडी कामगाराचा मृत्यु. शिराळा -  प्रतिनिधी   (आनंदा सुतार ) आरळा ता. शिराळा येथे आर सी सी इमारतीचे बांधकाम करत असताना अकरा हजार के व्ही च्या विजेच्या तारेचा शॉक लागुन गवंडी काम करणाऱ्या अनिल परशराम पाटील वय २४ सध्या रा. आरळा मुळ गांव मेरडा ता. खानापूर जिल्हा बेळगांव  याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडलीअसुन याची फिर्याद अनिल यांचा भाऊ सुनिल परशराम पाटील वय ३२ यांनी कोकरुड पोलिसात दिली आहे.      याबाबत कोकरुड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरळा येथे विठ्ठल आनंदराव पाटील मुळ गांव उदागिरी ता. शाहूवाडी  यांच्या आर सी सी इमारतीच्या दुसऱ्या माजल्याचे बांधकाम आरळा येथे सुरू असताना मयत अनिल हा मोबाईल वरआलेल्या फोनवर बोलत असताना इमारतीच्या बाजूने गेलेल्या ११ हजार के. व्ही. उच्च दाबाच्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन अनिल परशराम पाटील वय २४  हा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकला गेला. स्थानिक नागरीकांनी त्याला तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला...

बाबासो रामचंद्र पाटील यांची मुख्याध्यापकपदी निवड.

Image
  बाबासो  रामचंद्र पाटील यांची मुख्याध्यापकपदी  निवड. उंडाळे - प्रतिनिधि, ( प्रदिप पाटील) उंडाळे येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेतील स्वा.दादासाहेब उंडाळकर विद्यालयात कार्यरत असणारे बाबासो  रामचंद्र पाटील यांची "ग्रामिण विकास शिक्षण संस्था उंडाळे"च्या हौसाई शिक्षण संकुलाच्या 'मुख्याध्यापक' पदी निवड झाली असुन त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संचालक अँड. आनंदराव पाटील, संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षकोत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

फुटपाथ नक्की कोणासाठी ? सार्वजनिक बांधकाम विभागाला पादचाऱ्यांचा प्रश्न.

Image
  फुटपाथ नक्की कोणासाठी  ?  सार्वजनिक बांधकाम विभागाला पादचाऱ्यांचा प्रश्न. पादचाऱ्यांच्या हक्काची जागा व्यावसायिक कारणांसाठी वापरणारा यांच्यावर कोण वचक बसवणार  ?    उंडाळे  -  ( प्रतिनिधि) प्रदिप पाटील,  रस्त्यावर पहिला हक्क आहे पादचाऱ्यांचा असे नेहमीच सांगितले जाते; मात्र नव्याने होऊ घातलेल्या पाचवड फाटा-येणपे मुख्य मार्गाच्या  रस्त्यांच्या दोन्ही बाजुस असण्या-या फुटपाथचे चित्र पाहता, पादचाऱ्यांनी चालायचे कुठून? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना  पडला आहे.यामुळे पादचारी हा पादचारी मार्ग वापरू शकत नाही यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.   पाचवड फाटा, ओंड,  उंडाळे गावा अंतर्गत बांधण्यात येणा-या गटारी वजा फुटपाथ हा नेमका कुणासाठी ?     वडापाव गाड्या, टपऱ्या, भाजीपाला, फळे  विक्रेत्यांनी फुटपाथ आमच्या हक्काचे अशा  भूमिकेने सर्वच ठिकाणी ताबा घेतला असून, या अतिक्रमणांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असुन याकडे स्थानिक पोलिस, प्रशासनासह संबंधित गावच्या ग्रामपंचायती अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आ...

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या पाटण तालुका कार्यकारिणी जाहीर.

Image
  भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या पाटण तालुका कार्यकारिणी जाहीर. "पाटण तालुका अध्यक्षपदी काढणे गावचे सुपुत्र अभिषेक नानासाहेब पाटील यांची निवड."       पाटण - प्रतिनिधि,   युवकांच्या प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्थ्या (NYCI) यांची सातारा जिल्हा (पाटण तालुका) कार्यकारणी महाराष्ट्र NYCI अध्यक्ष श्री त्रिवेनीकुमार कोरे व सातारा जिल्हा अध्यक्ष श्री प्रशांत गुरव यांनी जाहीर केली.कु.अभिषेक नानासाहेब पाटील (तालुका अध्यक्ष)कु.निकिता आनंदा पवार(उपाध्यक्षा)कु.विश्वतेज यशवंत जाधव (महासचिव)कु.जयदीप जयवंत पाटील (कोषाध्यक्ष)कु.अविनाश प्रकाश झोरे(सचिव)कु.विशाल जगन्नाथ पवार(सचिव)कु.अंकिता तानाजी जाधव (सचिव)कु.अमित जगन्नाथ पाटील(सचिव),कु.संकेत बजरंग पाटील(तालुका समन्वयक)कु.श्रद्धा विवेक खामकर(तालुका समन्वयक)अक्षय रामचंद्र शिंदे (तालुका समन्वयक)  अनिकेत किसन गालवे (तालुका समन्वयक)  शरद सुरेश कांबळे (तालुका समन्वयक)  सुजित विजय पाटील (तालुका समन्वयक)  प्रतीक सुरेश गुरव (तालुका समन्वयक)या सभासदांची  पाटण तालुका कार्यका...

उंडाळे येथे आरोही ग्राहक सेवा केंद्र सुरू. " माजी जि.प.सदस्य मा.आनंदराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन."

Image
  उंडाळे  येथे आरोही ग्राहक सेवा केंद्र सुरू.  " माजी जि.प.सदस्य मा.आनंदराव पाटील  यांच्या हस्ते  उद्घाटन."   उंडाळे - प्रतिनिधि,        आरोही   ऑनलाइन बैंकिंग सुविधा केंद्र सुरु  करण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे.या सुविधा केंद्राचे   उद्घाटन माजी जि.प.सदस्य मा.आनंदराव पाटील , यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा.भरत देसाई , भाजपा जेष्ठ नेते मा.शरद देव , भाजपा युवा मोर्चा मलकापुर अध्यक्ष मा.तानाजी देशमुख, दै.सकाळ चे पत्रकार मा.शांताराम पाटील, गोंडवाना न्यूजचे संपादक प्रा.(डॉ.) विनोद कांबळे, येवती गावचे पोलिस पाटील ह.भ.प.शंकर महिन्दकर ,मनसेचे मा.चंदुभाऊ, मा.जयप्रकाश माने , मलकापुरचे पोलिस पाटील मा.प्रशांत गावडे, मलकापुरचे नगरसेवक मा.आणासाहेब काशिद, मा.हणमंत सुर्यवंशी, जिंति गावचे पोलिस पाटील मा.संतोष पाटील, हवेलवाडी चे पोलिस पाटील मा.कृष्णत नलवडे, मा.शरद पाटील, मा.रामचंद्र चव्हाण, मा.प्रविण पाटील, मा.संदिप भावके, मा.संतोष शिंदे, मा.पै.प्रकाश पाटील, मा.महेश खं...