उप अभियंता सुनील आडके यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात साजरा.

 उप अभियंता सुनील आडके यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात साजरा.




कराड - प्रतिनिधि,

कराड पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता सुनील आडके यांचा पंचायत समितीच्या वतीने सेवानिवृत्तीनंतर सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे म्हणाले उप अभियंता सुनील आडके यांनी पाणीपुरवठा विभागा मध्ये चांगल्या प्रकारे काम केले आहे विविध योजनांची अंमलबजावणी उत्कृष्ट केली आहे त्यांच्या कामाची पद्धत इतरांना देखील आदर्शवत अशी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले या वेळी गटविकास अधिकारी आबासाहेब पवार पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण पंचायत समितीचे सदस्य अॅड शरद पोळ कृषी अधिकारी गोखले यांचा देखील सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सेवानिवृत्त उप अभियंता आरळेकर पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले शाखा अभियंता शुभांगी पाटील मॅडम, शाखा अभियंता महतो मॅडम, शाखा अभियंता कुंभार मॅडम, शाखा अभियंता अमृता पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना आडके म्हणाले कराड पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागात काम करताना मला खुप काही चांगले अनुभव आले आणि येथील प्रत्येक कर्मचारी यांना देखील मी धन्यवाद देतो त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केले या परिसरातील बहुतांशी गावामध्ये कामा निमित्त जाण्याचा योग आला तोही अनुभव खूप छान होता लोकांना देखील माझ्या कामा बद्दल कौतुक केले हीच माझ्या चांगल्या कामाची पोच पावती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Comments

  1. श्री.आडके साहेब , सेवानिवृत्ती हार्दिक शुभेच्छा . सेवानिवृत्ती नंतरचे आपले आयुष्य सुखासमाधानाने जावो, व निरामय स्वास्थ लाभो.ही प्रभूचरणी प्रार्थना .... पी.ऐन. अमृतकर. सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .