जिंती ता - कराड गावचे सुपुत्र अधिक पाटील यांना डॉक्टरेट पदवी.
जिंती ता - कराड गावचे सुपुत्र अधिक पाटील यांना डॉक्टरेट पदवी. उंडाळे - ब्युरो रीपोर्ट गोंडवाना न्यूज. जिंती ता - कराड गावचे सुपुत्र पुणे येथील सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज चे मॅकेनिकल इंजिनिअरिंग चे प्राध्यापक अधिक सर्जेराव पाटील यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंग या विषयात डॉक्टरेट मिळवली. अधिक पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिंती येथे तर माध्यमिक व उच्च शिक्षण त्यांनी उंडाळे, कराड,पुणे येथे पूर्ण केले.सिंहगड इंजननिअरिंग कॉलेजचे मॅकेनिकल इंजिनिअरिंग चे प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून मॅकेनिकल इंजिनिअरिंग या विषयात पी एच डी पूर्ण केली. त्यांना यासाठी विद्यापीठातील डॉ.संदीप कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.