युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न .

 युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न .

" वाढदिवसाचे औचित्य साधून युवा उद्योजक शिबीराचे आयोजन."



कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.)

शिराळा: येथील साई संस्कृती भवन येथे आज युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, लेखक, युवा उद्योजक मा. शरद तांदळे प्रमुख वक्ते होते. विश्वास उद्योग समुहाचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाध्यक्ष विराजदादा प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी मा. विराज नाईक याचा वाढदिवसानिमित्त सत्कार झाला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक जिल्हाध्यक्ष नाईक यांनी केले. कार्यक्रमास वाळवा तालुक्याचे माजी सभापती रविंद्र बर्डे, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, आपल बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक, जि.प. सदस्य अश्विनीताई नाईक व संजीव पाटील, रंजनाताई नाईक, तालुक्याचे माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, डॉ. शिमोनी नाईक, ॲड. शुभलक्ष्मी नाईक, दिपाली नाईक, आरती नाईक, विश्वप्रताप नाईक, रोहित नाईक, भूषण नाईक, देवेंद्र नाईक, पृथ्वीसिंग नाईक, मृणाल नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधना पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रविण शेटे, महादेव कदम व के .डी. पाटील, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पूजा लाड, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संपतराव शिंदे,  युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हर्षद माने. जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्ष एम. जी. पाटील, शिराळ्याच्या नगराध्यक्ष सुनिता निकम व सर्व नगरसेवक, हर्षवर्धन पाटील, 'विश्वास' व 'विराज' उद्योग समूहातील सर्व संचालक, अधिकारी, शिराळा मतदार संघातून आलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, युवक, युवती, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सचिन पाटील यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .