टाळगाव येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश काळे यांची निवड.

 टाळगाव येथील  तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश काळे यांची निवड.



उंडाळे - गोंडवाना न्युज.

 टाळगाव ता.कराड येथील  तंटामुक्त समिती सभा दि. ३१ रोजी संपन्न झाली. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्वाच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे याचे एकमताने नाव सुचवण्यात आले. त्यास मोतीराम पाटिल यांनी अनुमोदन दिले. 

 प्रकाश काळे यांनी याअगोदर महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापने पासुन सदस्य म्हणून काम केले आहे. ते सध्या भष्टाचार विरोधी जनशक्ती  तालुका अध्यक्ष , भारतीय जनसंसद तालुका अध्यक्ष, मानवाधिकार कल्याणकारी संघटना उपाध्यक्ष सातारा जिल्हा, भारतीय विरशैय लिंगायत शिवा संघटना सातारा उपाध्यक्ष अशा अनेक संघटने वरती त्यांनी  काम केले आहे. 

 या निवडीबद्दल त्यांचे माजी. मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, रयत सहकारी साखर कारखाना चेअरमन, जिल्हा,परिषद सदस्य, व क्राँग्रेस सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटिल , भारत अँगेन करिप्शन अध्यक्ष हेंमत पाटिल पुणे, विरशैय शिवा संघटना अध्यक्ष सुनिल निदान, भारतीय जनसंसद अध्यक्ष संजय माने टाळगाव सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .