आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न.
आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न.
कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.)
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा देवराज पाटील व विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांतजी देवकर हे उपस्थित होते. यावेळी सांगली जिल्हा नियोजन कमिटी वरती घेण्यात आलेले मा. श्री.देवराज पाटील यांचा सत्कार पंचायत समिती सदस्य कुटे नाना व आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व मा.बाबासाहेब मुळीक यांचा सत्कार मा.भारत तात्या पाटील व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेले भारत तात्या पाटील यांचा सत्कार श्री.विष्णूपंत पाटील यांनी केला व तालुका राष्ट्रवादी सर्व सेलच्या कार्यकारणी 1ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे देणे बाबत सर्व पदा अधिकारी यांना सुचना करण्यात आल्या ,आटपाडी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment