पत्रकार सागर पाटील यांना 'समाजगौरव पुरस्काराचे' वितरण.
पत्रकार सागर पाटील यांना 'समाजगौरव पुरस्काराचे' वितरण.
पाटण - प्रतिनिधी,
आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान आणि तिरंगा रक्षक वर्तमानपत्राच्या वतीने देण्यात येणारा समाजगौरव पुरस्कार पत्रकार सागर पाटील यांना नुकताच मुंद्रूळकोळे ग्रामपंचायत येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी तिरंगा रक्षक चे संपादक, आदर्शमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, रविंद्र कांबळे, धरणीमाता फाऊंडेशनचे वाघ यांची उपस्थिती होती.यावेळी मंद्रुळकोळे गावातील मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment