इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय स्पर्धेत अपलोडिंग मध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रात अव्वल.
इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय स्पर्धेत अपलोडिंग मध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रात अव्वल.
जिल्ह्यातून 208 शाळांची उपकरणे सज्ज राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी 10% प्रयोग निवडणार.
सातारा प्रतिनिधी :-
केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित इन्स्पायर अवार्ड मानक स्पर्धा 2020 - 21 साठी सातारा जिल्ह्यातील विविध शाळांमधून 208 उपकरणे सज्ज झाली आहेत. आता त्यांच्या ऑनलाइन मूल्यमापनाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
या इन्स्पायर अवार्ड मानक स्पर्धेत इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी 50 व माध्यमिक शाळांनी 158 अशी एकूण 208 उपकरणे निर्माण केली आहेत. यातील राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी दहा टक्के म्हणजेच एकूण उपकरणाच्या 21 उपकरणांची निवड होणार आहे.
परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्हास्तरावर ऑनलाइन मूल्यमापन होऊन राज्यभरातून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी दहा हजार उपकरणे निवडण्यात येणार आहेत. तर राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी देशभरातून केवळ एक हजार उपकरणे निवडण्यात येणार आहेत. त्यापैकी साठ उपकरणांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे.
तसेच या स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये पुरस्कार मूल्य जमा झाली आहेत. असे सातारा जिल्हा इन्स्पायर अवार्ड मानकचे समन्वयक लक्ष्मण उबाळे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातून जास्तीत जास्त व उत्कृष्ट उपकरणे वेळेत तयार करून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, विज्ञान पर्यवेक्षिका मंगल मोरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले . सातारा जिल्ह्यासाठी NIF अहमदाबाद गुजरातच्या डॉ. प्रा. प्रियांका खोले व राज्य विज्ञान संस्था नागपूर चे संचालक रमतकर साहेब यांनी राज्य स्तरावरून मार्गदर्शन केले .
त्याच बरोबर सातारा जिल्ह्याचे वेळोवेळी अपडेट देण्याचे काम आरती साळुंखे यांनी केले. व सातारा जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे श्री कोटेश्वर विद्यालय गोवे यांनी जिल्ह्यातील निवड झालेली उपकरणे कशा पद्धतीने ऑनलाईन अपलोडिंग करावी व ऑनलाइन माहिती भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी जिल्ह्यातील शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कामासाठी त्यांना जि. प. शाळा काळज चे सचिन पंडित व शिवथर माध्यमिक विद्यालयाचे संभाजी पाटील यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment