ई - पीक नोंदणी आवश्यक आनंदराव देवकर यांचे प्रतिपादन.

ई - पीक नोंदणी आवश्यक आनंदराव देवकर यांचे प्रतिपादन.

कार्वे - प्रतिनिधी.
आत्तापर्यंत आपल्या शेतातील पिकांची नोंदणी तलाठी करत होते. परंतु आता शासनाने सर्व शेतकरी खातेदारांना पीक पाहणी या अँड्रॉइड ॲप द्वारे आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतःला शेतात जाऊन करण्याची संधी दिली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी करावी असे आवाहन कराडचे नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी केले आहे.
कोडोली ता. कराड येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोरोनाचे नियम पाळून झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार देवकर  म्हणाले, शेतकऱ्यांनी ई - पीक पाहणी हे ॲप घेऊन आपल्या शेतातील पिकांची नोंदणी वेळेत पूर्ण करून घ्यावी. नोंदणी न केल्यास सदरच्या शेतकऱ्याचा सातबारा मधील पिक पेरा कोरा राहिल.यामुळे कोणतीही शासकीय मदत आपणास प्राप्त होणार नाही. तसेच पीक विमा, पीक कर्ज अनुदान प्राप्त होणार नाही. तरी सर्वांनी आपली पिकाची नोंद अद्ययावत करावी. नोंदणीस अडचण आल्यास महसूल विभागाशी संपर्क साधावा.
याचबरोबर नायब तहसीलदार देवकर पुढे म्हणाले ,कोडोली गाव कोरोना मुक्त झालेले आहे. तरी कोरोनाचा पादुरर्भाव आपल्या गावामध्ये होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी.तसेच गावामध्ये कोरोना लसीकरण 90% पूर्ण झालेले आहे. परंतु कोरोना लस न घेतलेल्या लोकांनी लवकरात लवकर कोरोना लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी आव्हान केले.
यावेळी कराडचे मंडल आधिकारी जयराम बोडके व कोडोली चे तलाठी लालासाहेब साळुंखे यांनी शेतकऱ्यांना ई - पीक ॲप विषयी माहिती कशी अद्ययावत करावे याबद्दल मार्गदर्शन केले . यावेळी तलाठी साळुंखे म्हणाले की,आम्ही स्वतः ता तरुण शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ई - पीक पाहणी ॲप विषयी मार्गदर्शन केले. तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतात जाऊन ई - पीक पाहणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. यामुळे कोडोली गावातील शेतकऱ्यांची ई - पीक पाहणी ऑनलाइन होण्यास मदत झाली आहे.
  यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आरोग्य परिचारिका ए. एस कुलकर्णी, गटप्रवर्तक ललिता पवार तसेच सर्व आशा व अंगणवाडी सेविका पोलीस पाटील सुधाकर जगताप, सुनिल जाधव ,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .