उंडाळे ग्रामपंचायतीकडुन दुर्लक्ष हायमास स्ट्रिट लाईट पुन्हा एखादा बंद अवस्थेत.
उंडाळे ग्रामपंचायतीकडुन दुर्लक्ष हायमास स्ट्रिट लाईट पुन्हा एखादा बंद अवस्थेत.
वारंवार बंद पडणा-यां हायमास स्ट्रिट खांबाचे गौंडबंगाल काय ?.. नागरिकामधुन जोरदार चर्चा..
उंडाळे - गोंडवाना न्युज.
खा.श्रीनिवास पाटीलसाहेब यांच्या प्रयत्नातून उंडाळे ता.कराड गावातील प्रमुख चौकाच्या ठिकाणी चांगल्या दिवाबत्तीची सोय व्हावी म्हणून गावातील मुख्य ठिकाणी बाजार पेठ चौक, सवादे तुळसण रोड, एस टी स्टँड प्रशासकीय इमारती समोर व बौद्ध वस्ती येथे हायमास मंजूर झाले होते. सदरील हायमास बसवुन सहा-सात महिन्याचा कालावधी झाला असुन गावातील बाजारपेठ चौक , बौध्दवस्ती परिसरासह एस टी स्टँड प्रशासकीय इमारती समोल हायमास स्ट्रिट लाईट सुरु करण्यात आल्या होत्या ,मात्र गत पाच सहा दिवसापासुन मेन रस्त्यालगत असण्या-या एस टि स्टँड परिसरातील स्ट्रिट लाईट गत सहा -सात महिन्यामध्ये अनेकवेळा बंद-चालु अवस्थेमध्ये प्रामुख्याने दिसुन येते, गावात इतरत्र असणाऱ्या स्ट्रिट लाईट मात्र अव्याहतपणे कार्यरत आहेत अपवाद वगळता मेन रोड वरील बंद अवस्थेत असुन याच्यामुळे स्टँड परिसरात अंधाराचे साम्राज्य दिसुन येत आहे.
गत सहा-सात महिन्यामध्ये अनेकवेळा बंद-चालु अवस्थेत आढळुन येणारा या स्ट्रिट लाईट खांबाबद्दल नेमंक गौंडबंगाल काय आहे? हाच सध्या ग्रामस्थानमधुन चर्चेचा विषय असुन संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी ही याबाबत सविस्तर माहिती देण्यास टाळत असल्याचे ग्रामस्थामधुन बोलले जात आहे. सदरील स्ट्रिट लाईन उंडाळे गावातील मुक्याच्या ठिकाणी असुन वारंवार बंद अवस्थेत आढळण्या-या खांब पुर्वरत करावा अन्यथा कायम स्वरुपी काढुन टाकुन त्या परिसरामध्ये पुर्वीप्रमाणे एलईडी बल्बची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उंडाळे गावच्या दर्शनी भागात मेन रोडवर कार्यरत असणाऱ्या हायमास स्ट्रिट लाईट बंद असल्याने वाहनधारकासह गावातील नागरिकांची गैरसोय होवुन अपघात होण्याची दाट शक्यता असुन ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पुर्वरत करावी.
विकास पाटील, ग्रामस्थ, उंडाळे
Comments
Post a Comment